Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. यूएसजीएसकडून एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी तुर्कस्तानच्या नुरदागीपासून 23 किमी पूर्वेला 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सुमारे एक मिनिट चाललेल्या या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

अनेक इमारती कोसळल्या

राज्य प्रसारक TRT कडील फोटोंमध्ये इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोक बचावासाठी बर्फाळ रस्त्यांवर अडकले आहेत. रॉयटर्सच्या मते, हा भूकंप सुमारे एक मिनिट चालला. यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या भागात अनेक भूकंप झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)