Transgender | Representational image (Photo Credits: pixabay)

Gender Discrimination And Equality: एखाद्या मुलाला शाळेत त्यांची लिंग ओळख बदलायची असेल तर इंग्लंडमधील शिक्षकांनी पालकांना त्याबाबत कळवले पाहिजे, याबाबत संबंधित विभागाने शाळांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे याबात सदर विभागाने शाळांना मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन (DfE) ने ही मार्गदर्शक तत्वे (Transgender Guidance) जारी केली आहेत. ज्यामध्ये मुलांची नावे, सर्वनामे, गणवेश विचारात घेताना व्यापक दृष्टीकोणावर भर दिला आहे. काही बाबींमध्ये महत्त्वपूर्ण जोखीम लक्षात आल्यास संबंधीत माहिती गुप्त ठेवण्याची परवानगीही शिक्षकांना देण्यात आली आहे.

शिक्षण सचिव गिलियन कीगन यांनी मुलांबद्दलच्या त्यांच्या निर्णयांमध्ये पालकांच्या सहभागाच्या महत्त्वावर जोर दिला आहे. तर, महिला आणि समानता मंत्री केमी बॅडेनॉक स्पष्ट करतात की, सामाजिक संक्रमणासाठी मुलाची विनंती स्वीकारण्यास शाळा बांधील नाहीत. इंग्लंडमधील शाळांना लागू असणार्‍या मार्गदर्शनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे आणि पालकांचे मत विचारात घेणे यात संतुलन राखणे हा आहे. (हेही वाचा, Blessing To Same Sex Couple: पोप फ्रान्सीस यांच्याकडून समलिंगी विवाह करणाऱ्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यास अधिकृत मान्यता)

डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन (DfE) ने इंग्लंडमधील शाळांना जारी केलेल्या नवीन मार्गदर्श तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या मुलाने शाळेत असताना त्यांची लिंग ओळख बदलण्याची इच्छा व्यक्त केली तर पालकांना कळवा. जेव्हा विद्यार्थी नवीन नावे, सर्वनाम किंवा गणवेश शोधतात तेव्हा मार्गदर्शन तत्वे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. मुलासाठी "महत्त्वपूर्ण" धोका असल्याचे त्यांना वाटत असल्यास शिक्षक माहिती रोखू शकतात. शिक्षण सचिव गिलियन कीगन त्यांच्या मुलांबद्दलच्या निर्णयांमध्ये पालकांच्या सहभागाच्या महत्त्वावर भर देतात. ते पालकांचा मुलांबाबतचा दृष्टीकोन, जबाबदारी आणि स्वातंत्र्य मान्य करत म्हणतात की, पालकांचे विचार केंद्रस्थानी असले पाहिजेत.

मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, विद्यार्थांना सामाजिक संक्रमणास अनुमती देणे शिक्षकांचे "सामान्य कर्तव्य" नाही. परिणामी "सावध प्रतीक्षा कालावधी" आणि निर्णय घेण्यापूर्वी पालकांशी पूर्ण सल्लामसलत याबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शन करतात. चेस्टरफील्ड हायस्कूलचे मुख्य शिक्षक केविन सेक्स्टन विश्वास व्यक्त करत म्हणातत की, ही मार्गदर्शक तत्वे ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सध्याच्या पद्धतींमध्ये लक्षणीय बदल करणार नाही. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Same-Sex Couples: समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास Church of England राजी; 8 तासांची चर्चा व मतदानानंतर घेतला ऐतिहासिक निर्णय)

मार्गदर्शक तत्वांमध्ये खास करुन मुलाच्या जन्माच्या लिंगावर आधारित शौचालये, गणवेश बदलण्याच्या खोल्या आणि काही खेळ वेगळे करण्याची शिफारस केली आहे. त्यात असेह म्हटले आहे की, शाळांनी 11 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना विरुद्ध लिंगाच्या मुलासमोर कपडे बदलण्याची किंवा धुण्याची परवानगी देऊ नये. मार्गदर्शक तत्वांचे स्वागत करताना, असोसिएशन ऑफ स्कूल अँड कॉलेज लीडर्स (ASCL) ने स्पष्टता आणि व्यवहार्यतेसाठी त्यांचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता प्रतिपादली आहे. मार्गदर्शक तत्त्वे अंतिम होण्यापूर्वी 12-आठवड्यांच्या सार्वजनिक सल्लामसलत, शिक्षक, पालक आणि स्वारस्य गटांकडून सूचना, आक्षेप आणि बदल मागवले जातील. काही शिक्षक प्रकाशित मार्गदर्शनावर दिलासा व्यक्त करतात, तर काहींनी संभाव्य गुंतागुंत आणि ट्रान्सजेंडर किंवा बायनरी नसलेल्या मुलांसाठी विस्तारीत माहितीचा अभाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.