Same-Sex Couples: समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास Church of England राजी; 8 तासांची चर्चा व मतदानानंतर घेतला ऐतिहासिक निर्णय
आज समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्याबाबत 8 तास चर्चा झाली. त्यामध्ये वादविवादानंतर, चर्च ऑफ इंग्लंडच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या जनरल सिनॉडने 250 मतांनी बिशपच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.
चर्च ऑफ इंग्लंडने समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्यास परवानगी दिली आहे. आज याबाबत मतदान पार पडले व अखेर समलैंगिकतेबद्दल प्रशासकीय मंडळाच्या ऐतिहासिक मतानंतर चर्चच्या भूमिकेत बदल घडला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 2013 पासून समलिंगी विवाह कायदेशीर आहे, परंतु चर्च ऑफ इंग्लंडने तो बदल अजून स्वीकारलेला नव्हता. याआधी बुधवारी चर्चने एक निवेदन जारी केले होते की, ते आपल्या चर्चमध्ये समलिंगी विवाहांना परवानगी देऊ शकत नाही. मात्र चर्चने असेही सांगितले की समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद मिळण्याची आणि इतर सेवांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार केला जाईल.
आता आज समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्याबाबत 8 तास चर्चा झाली. त्यामध्ये वादविवादानंतर, चर्च ऑफ इंग्लंडच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या जनरल सिनॉडने 250 मतांनी बिशपच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.
JUST IN - Church of England votes to offer blessings to same-sex couples after an 8-hour debate across two days.
— Disclose.tv (@disclosetv) February 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2023 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

