Hyderabad Gang Rape: हैदराबादमध्ये महिलेवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

हैदराबादमधील (Hyderabad) एका प्रख्यात रिअल इस्टेट फर्मच्या दोन सेल्स एक्झिक्युटिव्हना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर त्यांच्या 26 वर्षीय महिला सहकाऱ्याला कारमध्ये अंमली पदार्थ पिऊन, सामूहिक बलात्कार (Hyderabad Gang Rape) आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या दोघांनी बुधवारी (30 जून) रात्री कथीतरित्या पीडितेवर अत्याचार केले. संगा रेड्डी (39) आणि जनार्दन रेड्डी (25) अशी आरोपींची नावे आहेत. अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेला मारहाण केल्यानंतर मियापूर येथील एका खासगी वसतिगृहाबाहेर सोडले.

शून्य FIR द्वारे गुन्हा दाखल

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात उप्पल पोलीस ठाण्यात शून्य एफआयआरद्वारे गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, हा गुन्हा मियापूर पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तो त्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार), कलम 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), कलम 509 (स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान), कलम 420 (फसवणूक) अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा, Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमध्ये वडिलांचा पोटच्या मुलीवर 6 वर्षे बलात्कार; मुलगी गरोदर, कोर्टाने आरोपीला सुनावली 101 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)

मियापूरचे एसएचओ व्ही दुर्गा रामा लिंग प्रसाद यांनी सांगितले, "बचावलेल्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे." पीडितेला न्याय मिळावा यासाठी तपास सुरू आहे.

शीतपेयातून गुंगीचे औषध

प्राप्त माहितीनुसार, यादागिरीगुट्टा येथील महिला काही कामानिमित्त मियापूरला गेली असताना ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरपींनी तिला भेटायला बोलावले आणि तिला कारमध्ये घेतले. रात्री परतीच्या प्रवासात ते एका बांधकामाधीन इमारतीजवळ थांबले आणि त्यांनी त्यांची कार खराब झाल्याचा दावा केला. आरोपींनी महिलेला (पीडिता) जेवण देऊ केले. मात्र, तिने नाकारले. त्यांनी तिला शीतपेय दिले. जे तिने स्वीकारले. शीतपेय प्यायल्यानंतर काहीच वेळात तिला चक्कर आली. तेव्हाच तिला ड्रिंक्समथ्ये काहीतरी असल्याचा संशय आला. तिने आपली प्रकृती बिघडल्याचा दावा केला. दरम्यान, ती बेशुद्ध होत असल्याचा आरोपींनी फायदा घेतला. त्यांनी तिला कारमध्ये बसवले आणि पहाटेपर्यंत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेने आरोपींकडून तिला मारहाण झाल्याचाही दावा केला. मारहाणीनंतर दोघांनी तिला मियापूर येथील वसतिगृहात सोडून पळ काढला, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाल्याचे वृत्त नाही. मात्र, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलिसांनी म्हटले आहे.