ब्रिटेन (Britain)देशातील रहिवाशी फ्रेडी मैकोनल (Freddy Macconnel) या ट्रान्सजेंडर (Trangender) तरुणाने मागील वर्षी एका बाळाला जन्म दिला आहे, मात्र स्वतःला या बाळाचा कायदेशीर पिता म्हणवून घेण्यासाठी त्याला अद्याप मानव अधिकार कोर्टात (Human Rights Court) लढावे लागत आहे. पण फ्रेडी हा एक तरुण असून त्याने मुलाला जन्म कसा दिला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मुळात, जन्मतः फ्रेडी याचा जन्म एका मुलीच्या अवयवांसह झाला होता, मात्र वयाच्या सुरवातीच्या काळात त्याला आपण तृतीयपंथी असल्याची जाणीव झाल्याने त्याने लिंगबदल करून घेतला, पण पिता होण्याची आवड असल्याने त्याने आपल्या पोटातील गर्भाशय तसेच ठेवले होते. कालांतराने, स्पर्म डोनरच्या मदतीने फ्रेडी गरोदर राहिला व अलीकडेच त्याला बाळ झाले, हे बाळ अगदी हुबेहूब त्याच्या सारखेच दिसत आहे, मात्र या फर्डी एक ट्रान्सजेंडर असल्याने त्याला आपल्या बाळाचा कायदेशीर पिता बनण्यास रोखले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्मदाखला काढायला गेलेल्या फ्रेडीला संबंधित खात्यातील जनरल रजिस्टर कडून दाखल्यावर पिता म्हणवून घेण्यासाठी नकार मिळाला, ब्रिटनच्या 1836 मधील कायद्यान्व्ये जन्म दाखल्यावर आईचे नाव असणे बंधनकारक आहे, मात्र फ्रेडी हा जन्मदाता असला तरी त्याचे नाव आई म्हणून टाकता येणार नव्हते, यातूनच या वादाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात फ्रेडीचे वकील यांनी उच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादात, फ्रेडीचा मुलीपासून मुलगा बनेपर्यंतचा प्रवास मांडला होता शिवाय, बाळाच्या जन्माच्या एक वर्ष आधीच फ्रेडीला लिंग मान्यता प्रमाणपत्र मिळाले आहे असेही सांगण्यात आले होते. मुंबईकर तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय, जगातील सर्वात दुर्मिळ घटनेविषयी वाचा सविस्तर
दरम्यान, याप्रकरणी कोर्टाचा अंतिम निर्णय अद्याप येणे बाकी आहे. मात्र एकीकडे जगभरातील अनेक देशांमध्ये आता तृतीयपंथीना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे, अनेक ठिकाणी होणाऱ्या प्राईड परेड सारख्या उपक्रमांमधून या तृतीयपंथींना सामान्य नागरिकांप्रमाणेच समाजातील प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व मांडण्यास प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र असे असूनही फ्रेडी याला आपल्याच बळावर हक्क बजावण्यासाठी कोर्टात मागणी करावी लागणे हे दुर्दैवच म्हणायला हवे.