मुंबईकर तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय, जगातील सर्वात दुर्मिळ घटनेविषयी वाचा सविस्तर
Uterus Found In The Young Boy Stomach, Image For Representation (Photo Credits: Shutterstock)

मुंबई: भायखळा (Byculla) येथील राज्य सरकार संचलित जे जे रुग्णालयात (J J Hospital)  काही दिवसांपूर्वी एका शस्त्रक्रियेच्या दरम्यान तरुणाच्या पोटात गर्भाशय (Uterus) आढळल्याची माहिती सकाळ  दैनिकाच्या वृत्तातून समोर येत आहे. मुंबईतील हा 29 वर्षीय तरुण लग्न झाल्यावर दोन वर्ष वंध्यत्वाच्या समस्येने पीडित होता, या बाबत तो हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला असताना डॉक्टरांना त्याच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे आढळले, याशिवाय त्याचे टेस्टीस हे अंडकोषात नसून पोटातच असल्याचे देखील दिसून आले. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. मात्र शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्याच्या पोटात गर्भाशयाच्या सदृश्य एक अवयव आढळला ज्यामुळे शस्त्रक्रिया थांबवून डॉक्टरांनी त्याच्या चाचण्या केल्या, यामध्ये हा अवयव गर्भाशयच असल्याचे पक्के झाले. यांनतर पुन्हा डॉक्टरांनी तीन तासांची शस्त्रक्रिया करून त्याचे टेस्टीस पोटातून अंडकोषात सरकवले.

दरम्यान, एखाद्या पुरुषाच्या शरीरात गर्भाशय आढळणे ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे, आजवर जगात केवळ 200 पुरुषांच्या पोटात गर्भाशय आढळून आले आहे. असं असले तरीही ही कोणतीही विकृती नसून याला वैद्यकीय भाषेत 'फिमेल प्रायमरी म्युलिरियन ड्क्ट सिंड्रोम' असे म्हणतात. शरीरातील अँटीम्युलिरियन हार्मोन्सच्या कमतरतेमुळे गर्भाशयाची निर्मिती होऊ शकते, यावर योग्य उपचार न केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते अशी माहिती रुग्णालयातील डॉ. व्यंकट गीते यांनी दिली आहे. बीड मध्ये डॉक्टरांनी मजुरी करणाऱ्या 4605 महिलांची गर्भाशयं काढली, शिवसेना झाली आक्रमक

हा आजार नैसर्गिक असून कित्येकदा लहानपणी देखील याचे निदान होऊ शकते. पोटात गर्भाशय असलेल्या पुरुषांना बाळ होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. आजवर पोटात गर्भाशय असलेल्या 200 पुरुषांपैकी केवळ दोन पुरुषांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.