Accident (PC - File Photo)

Bus Accident In Nepal: नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य पश्चिम नेपाळमधील डांग (Dang District) जिल्ह्यात शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री उशीरा घडली. या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची पुष्टी नेपाळ पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भालुबांग (Bhalubang) येथे हा अपघात घडला. नेपाळ पोलिसंनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, बांकेच्या नेपाळगंज येथून काठमांडूला जाणारी प्रवासी बस पुलावरून पलटी होऊन राप्ती नदीत कोसळली.

मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली

नेपाळमधील भालुबंग येथील एरिया पोलीस कार्यालयातील मुख्य पोलीस निरीक्षक उज्ज्वल बहादूर सिंग यांनी बस अपघात कसा घडला याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. उर्वरीत मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, बसमधील जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी)

मृतांमधील दोन भारतीयांची ओळख पटली

ओळख पटलेल्या मृतांमध्ये असलेल्या दोन भारतीयांपैकी एकाच नाव योगेंद्र राम असे आहे. ते 67 वर्षांचे आहेत आणि मुळचे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. दुसऱ्याचे नाव मुने असे असून तो 31 वर्षांचा तरुण आहे. जो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. नेपाळ प्रशासनाने भारतीय प्रशासनाशी संपर्क साधला असून त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उज्ज्वल बहादूर सिंह यांनी सांगितले. (हेही वाचा, IRCTC Nepal Tour Package: नवीन वर्षात नेपाळला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले खास टूर पॅकेज; मुंबईवरून होणार सुरु, जाणून घ्या सविस्तर)

रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बस पुलावरून घसरण्याचे नेमके कारण तपासले जात असून, अधिकारी या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम करत आहेत रस्ते सुरक्षेशी निगडीत आव्हानांवर ही घटना प्रकाश टाकते. अशा अपघातांना रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांच्या गरजेवर भर देण्यात यावा ज्यामुळे रस्त्यावरील जीवितहानी कमी होईल, अशी भावना अपघात घडाला त्या घटनास्थळावरुन प्रसारमध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना एका नागरिकाने दिली.

दरम्यान, नेपाळ हा भारताच्या सीमेला लागून असलेल्या मोजक्या दशांपैकी एक देश आहे. त्यामुळे नेपाळमधील अनेक नागरिक भारतात येतात आणि भारतातीलही अनेक नागरिक नेपाळमध्ये जातात. त्यामुळे उभय देशांमध्ये नागरिकांचे येणेजाणे नेहमीच सुरु असते. अशा स्थितीत बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोन भारतीय नेमके कोणत्या कारणास्तव नेपाळमध्ये गेले होते आणि ते कोणत्या कारणासाठी प्रवास करत होते, याबातब माहितीची प्रतिक्षा आहे.