Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी

तेलंगणा जिल्ह्यातील हनुमाकोंडा राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस झाडाला धडकल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी
Telangana Accident:

Telangana Accident: तेलंगणा जिल्ह्यातील हनुमाकोंडा राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस झाडाला धडकल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात गर्भवती महिलेसह २६ जण जखमी झाले. वारंगलहून करीमनगरला जाणारी बस हनुमाकोंडा जिल्ह्यातील हसनपर्थी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाडाला धडकली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, "ही घटना काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बस वारंगलहून करीमनगरला जात होती. बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. या घटनेत 26 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे,"

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2024 08:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).