Indian-Origin Couple Suicide In In US: अमेरिकेतील भारतीय दाम्पत्याची आत्महत्या, शवविच्छेदन अहवालानंतर उलघडले मृत्यूचे गूढ
Firing (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स (Massachusetts) राज्यात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाची हत्या नव्हे तर त्यांनी आत्महत्या (Indian-Origin Family Suicide In US) केल्याचे पुढे आले आहे. हे कुटुंब 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या 5 दशलक्ष डॉलर्सच्या हवेलीत मृतावस्थेत आढळून आले होते. या मृत्यूाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी या मृत्यूचा कसून तपास केला त्यानंतर ही आत्महत्या (Murder-Suicide) असल्याचे सिद्ध झाले. या कुटुंबातील सदस्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ज्याच्या अहवालामध्ये या कुटुंबाने आत्महत्या (Rakesh Kamal Suicide) केल्याचे निष्पण झाल्याचे म्हटले आहे. राकेश कमल (वय-57 वर्षे), टीना कमल (वय 54 वर्षे) आणि त्यांची मुलगी एरियाना कमल (वय-8 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, कुटुंबाने हे पाऊल का उचलले असावे याबाबत स्थानिक आणि राज्याच्या अधिकाऱ्यांकडूनही चौकशी सुरु आहे.

शवविच्छेदन अहवालात आत्महत्येची पुष्टी:

मुख्य वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयातील शवविच्छेदन अहवालात तिघांचाही मृत्यू बंदूकीने झाडलेल्या गोळीने झाला आहे. त्यापैकी टीना आणि एरियाना कमल यांची हत्या राकेश कमल यांनी झाडलेल्या गोळीने झाली. तर स्वत: राकेश कमल यांन स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. संपूर्ण तपास या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Indian-Origin Couple Found Dead in US: अमेरिकेतील आलिशान हवेलीत भारतीय वंशाच्या पतीपत्नीचा मुलीसह गूढ मृत्यू)

परवाना नसलेल्या बंदुकीमुळे प्रश्नचिन्ह:

अधिकाऱ्यांनी कमल कुटुंबीयांच्या घराची झडती घेतली तेव्हा राकेश कमल यांच्याजवळ 40 कॅलिबर Glock 22 म्हणून ओळखली जाणारी बंदूक सापडली. ज्याचा त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. मॅसॅच्युसेट्स राज्य पोलिसांनी ही बंदूक नेमकी कोठून आली याबाबत शस्त्रास्त्र विभागाकडे अहवाल मागवला आहे.

कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही:

पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले आहे की, कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाही. त्यांचे शेजाऱ्यांशी असलेले संबंधही सौहार्दपूर्ण होते. डोव्हर आणि मॅसॅच्युसेट्स राज्य पोलीस अद्यापही तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात कमल निवासस्थानाशी पूर्वीचा कोणताही पोलिस अहवाल किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटनांचा संबंध आढळून आला नाही.

कुटुंबासमोर आर्थिक आव्हान

दरम्यान, कमल कुटुंबीय काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. कमल कुटुंबीय बोस्टनच्या नैऋत्येस सुमारे 32 किलोमीटरवर वसलेल्या डोव्हर येथे राहात असे. तसेच,हे कुटुंब एकेकाळी प्रसिद्धअसलेल्या मात्र आता बंद पडलेल्या शिक्षण प्रणाली कंपनी EduNova शी संबंधित होते. या कुटुंबाला अलिकडील काही काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता, असे समजते.  (हेही वाचा, Texas Road Accident: टेक्सासमध्ये भीषण रस्ता अपघात, भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू)

कौटुंबिक पार्श्वभूमी

राकेश कमल आणि टीना कमल, या दोन्ही कुशल व्यक्तींनी, 2016 मध्ये EduNova ची सह-स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या ग्रेड वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या या उपक्रमाला "विद्यार्थी यश प्रणाली" असे नाव दिले होते. कंपनी डिसेंबर 2021 मध्ये बंद पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूचीबद्ध टीनाने सप्टेंबर 2022 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो दायित्वांचा हवाला देऊन आणि अपुऱ्या कागदपत्रांमुळे डिसमिस करण्यात आला होता.

हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनी, टीनाने अमेरिकन रेड क्रॉस ऑफ मॅसॅच्युसेट्सच्या संचालक मंडळावर काम केले होते. शिक्षण आणि तंत्रज्ञानातील त्यांचा अनुभव व्यापक होता. बोस्टन युनिव्हर्सिटी, एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी राकेश कमल यांनी एड्युनोव्हापूर्वी शिक्षण-सल्लागार क्षेत्रात कार्यकारी पदे भूषवली आहेत.