Titanic Tourist Submarine (Photo Credits: Twitter)

अटलांटिक महासागरामध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजीचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडी मधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. “catastrophic” इव्हेंट मध्ये या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. Coast Guard official कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. "या दुःखद काळात या पाच आत्म्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आमची सहवेदना असल्याचं" त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान 18 जून पासून ही पाणबुडी बेपत्ता होती. तिचा शोध घेण्यासाठी कॅनडा, अमेरिकाचे नौदलही कामाला लागले होते.

ओशनगेट एक्सपीडिशन्स कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला पायलट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टॉकटन रश, प्रवासी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल हेन्री नार्गोलेट यांनी आपला जीव गमावल्याचं म्हटलं आहे. रविवारी पाणबुडी बेपत्ता झाली होती. या पाणबुडीमध्ये चार दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता.

कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी असलेल्या जहाजाचे अवशेष पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. टायटॅनिकचे अवशेष 3800 मीटर खोलवर आहेत. ते पहायला जाण्यासाठी  एका पर्यटकाला सुमारे 2 कोटी रुपये मोजावे लागतात.

दरम्यान टायटॅनिक जहाज हे 15 एप्रिल 1912 दिवशी समुद्रात बुडाले होते. या दुर्घटनेमध्ये 1500 जणांचा मृत्यू झाला. हिमनगाला जहाज आदळून त्याचे तुकडे झाले होते.