Coronavirus चा जन्म झालेल्या चीनमध्ये गेल्या एक महिन्यात कोरोना व्हायरसमुळे एकही मृत्यू नाही
Coronavirus (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची जगातील संख्या 300,000 पार झाली असून, जवळपास 4.5 दशलक्ष लोक या रोगाने बाधित आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, या प्रादुर्भावामुळे कमीतकमी 306,377लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे 4,593,434 रुग्ण असल्याची पुष्टी केली गेली आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे, चीन (China) पासून हा आजार संपूर्ण जगात पसरला, त्या चीनमध्ये आता गेल्या एक महिन्यात एकही कोरोना व्हायरस मृत्यूची नोंद झाली नाही. इथे  हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, वास्तविक मृत्यूची संख्या ही सरकारी आकडेवारीवरून संकलित केलेल्या संख्येपेक्षा खूपच जास्त असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी चीनमध्ये कोरोना विषाणूची चार नवीन प्रकरणे नोंदविली. जिलिन या ईशान्य प्रांतातील सर्व स्थानिक क्रॉस इन्फेक्शन जेथे अलिकडच्या काळात क्लस्टर आढळला आहे,  मात्र मृत्यूची नोंद अजूनतरी नाही. 14 एप्रिल रोजी आयोगाने शेवटच्या मृत्यूची नोंद केली होती. सध्या चीनमध्ये कोविड-19 च्या 100 पेक्षा कमी लोकांवर उपचार सुरू आहेत. चीनमध्ये कोरोनाव्हायरस मृत्यूची संख्या सध्या 4,633 आहे, तर एकूण एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 82,933 झाली आहे.

चीनमध्ये मंगळवारी 15 नवीन कोरोना विषाणूची प्रकरणे आढळली आहेत. त्यानंतर आता चीनच्या वुहान शहरातील संपूर्ण 11 दशलक्ष लोकांची कोरोना विषाणूची चाचणी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. चीनमधील वूहान या शहरामधुनच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला सुरुवात झाली होती.  अशा परिस्थितीत, विषाणूच्या हल्ल्याच्या दुसर्‍या लाटेचा अंदाज घेत चीनने सर्वतोपरी काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा:  चीन सोबत सर्व संबंध तोडून टाकण्याचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची क्षी जिनपिंग यांना अप्रत्यक्ष धमकी)

अहवालानुसार, देशात प्रवेश करणाऱ्या परदेशी लोकांसाठी चीनने सामाजिक अंतराचे नियम लागू केले आहेत. सध्या चीनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली असून, इथे मोठे कारखाने आणि छोट्या व्यवसायांना पुन्हा उत्पादन घेण्यास आणि ग्राहकांशी व्यवहार करण्यास अनुमती मिळाली आहे.