Turkey Earthquake (PC - Twitter/@meliodasima)

Turkey Earthquake: तुर्कस्तान (Turkey) आणि सीरिया (Syria) मध्ये झालेल्या भूकंपाने जगभरातील लोकांना हादरवून सोडले आहे. या भूकंपात (Earthquake) आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी व्यक्त केलेली भीती अधिक हृदयद्रावक आहे. वास्तविक, मार्टिन ग्रिफिथ्सने म्हटले आहे की, या विनाशकारी भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असेल.

मार्टिन ग्रिफिथ्स म्हणाले की, प्रत्यक्षात मी मृतांचा आकडा मोजायला सुरुवात केलेली नाही, पण ज्या प्रकारे ढिगारा दिसतोय, त्यावरून हा आकडा 50 हजारांच्या पुढे जाऊ शकतो, हे स्पष्ट होते. भूकंपातील अधिकृत मृतांची संख्या तुर्कीमध्ये 24,617 आणि सीरियामध्ये 3,574 आहे. कारण हजारो बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये मृतांची संख्या 24000 पेक्षा जास्त; बचाव कार्य सुरू)

युनायटेड नेशन्सने यापूर्वी म्हटलं होत की, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 870,000 लोकांना गरम अन्नाची तातडीची गरज आहे आणि एकट्या सीरियामध्ये 5.3 दशलक्ष लोक बेघर होऊ शकतात. (हेही वाचा - Turkey Earthquake: भारताकडून भूकंपग्रस्त तुर्कीला मदतीचा हात; विमानाने पोहोचवले आपत्ती निवारण साहित्य)

सुमारे 26 दशलक्ष लोक भूकंपामुळे प्रभावित झाले आहेत, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले की, दोन देशांमध्ये तातडीच्या आरोग्य गरजांना तोंड देण्यासाठी 42.8 दशलक्ष डॉलर्सचे तातडीचे आवाहन सुरू केले आहे. तुर्कीच्या आपत्ती एजन्सीने सांगितले की, तुर्की संस्थांमधील 32,000 हून अधिक लोक शोध आणि बचाव प्रयत्नांवर काम करत आहेत.