Overtime Work करताना डोक्यातील नस फाटून Tech कर्मचाऱअयाचा मृत्यू, सुट्टी असतानाही करत होता काम
Overtime Work | (Photo Credits: Pixabay)

निर्धारीत कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करणे तंत्रज्ञान क्षेत्रात (Tech Industry) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. हा कंपनी चीनमधील एका टेक कंपनीत (Tech Company) काम करत होता. विशेष म्हणजे तो अवघ्या 25 वर्षांचा होता. ओव्हरटाईम काम (Overtime Work) करत असताना ताण असहय्य झाल्याने या कर्मचाऱ्याच्या डोक्यातील नस फाटली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात चर्चा सुरु झाली आहे. सांगितले जात आहे की, चिनमधील लूनर न्यू ईयर (Lunar New Year) काळात अधिक काम करत असताना या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

बिलिबिलि ( Bilibili) कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडल्याचे वृत्त आहे. चीनमधील ट्विटर सारशाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या वीबो (Weibo) वर या घटनेबाबत विविध माहिती व्हायरल झाली आहे. या आधी वर्कप्लेस ( Work Place) बाबत काम करणाऱ्या एका कर्मचाऱअयाचा मृत्यू झाला होता. त्याच्या सहकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात त्यावेळी प्रसारमाध्यमांनी दावा केला होता की, त्याच्यावर अधिक वेळ काम करण्यासाठी दबाव होता. (हेही वाचा, Boring Jobs : शाब्बास रे पठ्ठ्या! नोकरीला कंटाळला, थेट कंपनीवरच दावा ठोकला; मिळवले 33 लाख)

दरम्यान, टेक कंपनीतील कर्मजाऱ्याचा मृत्यू झाला त्या दिवशी एका वीबो (Weibo) यूजर ने दावा त्या व्यक्तीने ब्लॉगरला धन्यावदा दिले आणि आपल्या भावाच्या कंपनीवर आरोप लावला की, इंटरनेटवर हे वृत्त दाबण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. चीनमधील इंटरनेटवर 25 वर्षीय कंटेंट मॉडरेटरचा डोक्यातील नस फाटल्याने मृत्यू झाला. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु आहेत. हा कर्मचारी शॉर्ट व्हिडिओ (Short Video) स्ट्रीमिंग साइट बिलिबिलि (Bilibili) साठी एक आठवड्याची सुट्टी मागत होता. दरम्यान, बिलबीलने कर्मचाऱ्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे आणि त्याच्या परीवाराची माफीही मागितली आहे.

बिलबिलने एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आम्ही एक उत्कृष्ट कर्मचारी गमावला आहे. ज्यामुळे आमच्या कंपनीचे खूप नुकसान झाले आहे. आमच्यासाठी ही डोळे उघडणारी घटना आहे. आम्ही आमच्या कार्यप्रणालीत लवकरच बदल आणू आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊ. टेक इंडस्ट्रत काम करणाऱ्या तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण पाठीमागील काही काळापासून वाढले आहे.