तुम्हाला जर तुमची नोकरी (Jobs) आवडली नाही तर तुम्ही काय कराल? हा प्रश्न जर कोणालाही विचारला तर कोणताही सर्वसामान्य व्यक्ती 'मी ती बदलेन' असे साधे आणि सरळ सोपे उत्तर देईल. पण एका पठ्ठ्याने चक्क आपण करत असलेली नोकरी (Employments) कंटाळवाणी आहे असे सांगत चक्क कंपनीवरच दावा ठोकाल. हा कर्मचारी केवळ कंपनीवर दावा ठोकूनच स्वस्थ बसला नाही. तर त्याने कंपनीकडून चक्क 33 लाख रुपये नुकसानभरपाईसुद्धा वसूल केली. होय, असे घडले आहे आणि या घटनेची माहिती देणारे वृत्त सोशल मीडियावर व्हायरलही (Social Media Viral) झाले आहे.
फ्रेड्रिक डेसनार्ड ( Frederic Desnard) असे या पठ्ठ्याचे नाव आहे. न्यू यॉर्क पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, फ्रेड्रिक डेसनार्ड याने आपल्या कंपनीविरोधात दावा ठोकला की, त्याला त्याची नोकरी कंटाळवाणी वाटत होती. कोर्टात हा खटला चक्क पाच वर्षे चालला आणि कोर्टाने या पठ्ठ्याला चक्क 33 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.
हे प्रकरण साधारण 2014 मध्ये सुरु झाले. फेड्रिक एका कॉस्मेटीक कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होता. त्या वेळी त्याचे वार्षिक पॅकेज साधारणर 67 लाख रुपयांच्या घरात होते. दरम्यान, कंपनीने त्याला डिमोट केले. या कारणामुळे त्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्याचे अवघे जीवनच बदलून गेले. वरुन कंपनी त्याला वारंवार राजीनामा देण्यासाठी दबाव टाकू लागली. पण त्याने राजीनामा काही दिला नाही. एक दिवस फ्रेड्रिक याचा अपघात झाला. त्यात तो 7 महिने अंथुरणाला खिळला. सात महिन्यांनी त्याने जेव्हा कंपनी पुन्हा जॉईन केले तेव्हा कंपनीने त्याला कामावरुन काढून टाकले. (हेही वाचा, Viral Video: नोकरी मिळाल्याचा आनंद, तरुणीने रस्त्यावरच केला डान्स, सीसीटीव्ही फुटेज पाहून अनेकांना आले हसू)
कंपनीच्या या वर्तनाविरोधत त्याने न्यायालयात खटला गुदरला. फ्रेड्रिकच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, कंपनीने फ्रेड्रिक याच्याकडून कोणतेही काम करुन घेतले नाही. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. परिणामी त्याला मानसिक आजाराला सामोरे जावे लागले. त्याला त्याच्या कामाचा प्रचंड कंटाळा आला.कंपनीने त्याच्यासोबत प्रताडीत वर्तन केले. त्यामुळे कंपनीने त्याला 3 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. खटला पाच वर्षे चालला अखेर कोर्टाने 33 रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश कंपनीला दिला. या खटल्यात फ्रेड्रिक जिंकला हे वेगळे सांगायला नकोच. सोशल मीडियावर या खटल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.