Young Woman Dancing | (Photo Credit - Instagram)

सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीचा व्हिडिओ भलताच व्हायरल (Viral Video) झाला आहे. ही तरुणी रस्त्यावर अचाकन डान्स करताना दिसत आहे. या तरुणीचा डान्स पाहून अनेकांना हसू फुटले आहे. झाले आहे असे की, ही तरुणी म्हणे एका ऑफिसमध्ये नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेली होती. मुलाखतीनंतर या तरुणीला नोकरीही (Job) मिळाली. नोकरी मिळाल्याचा या तरुणीला इतका आनंद झाला की, ही तरुणी चक्क रस्त्यावरच नाचायला लागली. तिचा हा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला. मजेशीर असे की या तरुणीच्या बॉसनेच या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ अमेरिकेतील (America) जॉर्जिया प्रांतातला आहे. इथे नोकरीसाठी आलेली तरुणी नोकरी मिळाल्यानंतर इतकी आनंदी झाली की ही तरुणी पार्किंग एरियातील रस्त्यावरच नाचू लागली. गंमत अशी की या मुलीला जराही कल्पना नव्हती की तिचा हा डान्स तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कौद झाला आहे. तिचा हा डान्स तिच्या Sensitive Savage नामक बॉसने केवळ पाहिलाच नाही तर, तो सोशल मीडियावरही शेअर केला. तिच्या बॉसने हा डान्स त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class)

 

View this post on Instagram

 

A post shared by @dakara_spence

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत बॉसने म्हटले की, 'या तरुणीला मी आताच नोकरी दिली आहे आणि ही तिची रिएक्शन आहे.' दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्युव्ज मिळाले आहेत. शेकडो लाईक आणि प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, खरोखरच हा आनंदाचा क्षण आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, नोकरी मिळवणे हे खरोखरच एक कठीण काम आहे.