Boeing 747 Dreamlifer | (Photo Credit - Twitter)

हेवेत झेपावलेल्या एका विमानाचे चाक हवेतच निखळल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, Boeing 747 Dreamlifer असे या विमानाचे नाव आहे. या विमानाने इटलीतील Taranto-Grottaglie Airport वरुन हवेत उड्डाण भरले होते. व्हिडिओत पाहायला मिळते की, धावपट्टीवरुन हवेत झेपावल्यावर पुढच्या काहीच सेकंदांमध्ये विमानाचे चाक निखळलते आणि ते धावपट्टीवरच कोसळलते. चाक कोसळतानाही व्हिडिओत पाहायला मिळते. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर या प्रकाराची माहिती क्रू मेंबर्सना तातडीने देण्यात आली. तसेच, विमान सुरक्षीतपणे धावपट्टीवर उतरविण्यात आले.

अधिक माहिती अशी की, बोईंग 747-400 लार्ज कार्गो फ्रायटर (LCF) ड्रीमलिफ्टर हे बोईंग 747-400 विमानावर आधारित वाइड-बॉडी मालवाहू विमान आहे. इटली, जपान आणि यूएस दरम्यान बोईंग 787 ड्रीमलाइनरचे भाग वाहतूक करण्यासाठी या विमानाची रचना करण्यात आली होती. (हेही वाचा, Air India चे विमान धावपट्टीवरून घसरले; अपघात टळल्याने वाचले 55 प्रवाशांचे प्राण)

ट्विट

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर या प्रकाराची माहिती क्रू मेंबर्सना तातडीने देण्यात आली. तसेच, विमान सुरक्षीतपणे धावपट्टीवर उतरविण्यात आले.