Afghanistan: तालिबान सरकारद्वारे अफगाणिस्तानातील महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याचे काही नावच घेत नाही आहे. अशातच आता तालिबानने एक नवे फरमान काढले आहे. त्यानुसार महिलांना सामान्य स्नानगृहाचा वापर करण्यावर बंदी घातली गेली आहे. खासा प्रेस यांनी दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे. हा निर्णय धार्मिक विद्वान आणि प्रांतातील अधिकाऱ्यांच्या सहमतीने घेतला आहे. हे निर्बंध उज्बेकिस्तान (Uzbekistan) च्या सीमालगतच्या उत्तरी बल्ख प्रांतासाठी आहे.
तालिबानने जाहीर केलेल्या आदेशात असे म्हटले की, लोकांना घरात आधुनिक स्नानगृहात पोहचता येत नाही. यासाठी पुरुषांना सामान्य बाथरुममध्ये जाण्याची परवानगी आहे. पण महिलांनी हिजाबचे पालन करत त्यांनी खासगी बाथरुमचा वापर करावा. या रिपोर्टमध्ये असे ही म्हटले की, निर्णयाच्या आधारावर महिलांना इस्लामिक हिजाब घालून सार्वजनिक स्नानगृहाऐवजी खासगी बाथरुमध्ये स्नान करु शकतात.(Coloured Tattoos Ban in EU: युरोपियन देशांमध्ये रंगीत टॅटूवर उद्यापासून येऊ शकते बंदी; कलाकार नाराज, जाणून घ्या कारण)
रिपोर्ट्सनुसार, कमी वयोगटातील मुलांना सुद्धा सार्वजनिक बाथरुम मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या सरकारने बॉडी मसाज संदर्भात ही नवा आदेश काढला आहे. त्यानुसार मुलांना बॉडी मसाज करण्यास बंदी असणार आहे. यापूर्वी पश्चिम हेरात प्रांतात स्थानिक अधिकाऱ्यांनी महिलांसना सामान्य बाथरुम अस्थायी रुपात बंद केले होते.
तालिबान्यांकडून महिलांवर वारंवार अत्याचार केले जात आहेत. मिनिस्ट्री ऑफ प्रमोशन वर्च्यू अॅन्ड प्रिव्हेंशन ऑफ वॉइस यांनी यापूर्वी देशभरात महिलांना 45 मील पर्यंतच प्रवास करता येईल असे म्हटले होते. त्याचसोबत कोणत्याही चालकाला दोन महिलांना आपल्या गाडीच्या दुसऱ्या सीटवर सुद्धा बसवू नये असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जर असे कोणी केल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा नियम काढला गेला आहे.