Taliban (Photo Credits: Getty Images)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांना मोठी टक्कर देणाऱ्या पंजशीर प्रांताला सुद्धा पराभव स्विकारावा लागला आहे. कारण पंजशीर येथून समोर आलेल्या फोटोंमध्ये असे सांगितले जात आहे की, तालिबान्यांनी यावर आपला ताबा मिळवला आहे. एका फोटोत असे दिसून येते की, पंजशीर मध्ये तालिबान्यांनी आपला झेंडा सुद्धा फडकवला आहे. दुसऱ्या बाजूला तालिबानी हे पंजशीर गव्हर्नर ऑफिसच्या बाहेर उभे आहेत.(Afghanistan: तालिबानी दहशतवाद्यांकडून गर्भवती महिला पोलिसावर गोळीबार, नातेवाईकांसमोर केली हत्या)

अफगाणचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचे निकटवर्तीय यांनी आजतक सोबत बातचीत करताना म्हटले की, तालिबान्यांचा दावा खोटा आहे. रेजिस्टेंटस फोर्स डोंगरांमधून पंजशीरची सुरक्षा करत आहे. दावा केला आहे की, पाकिस्तानी एअरफोर्स सुद्धा त्यांच्यावर हल्ला करत आहे.

तर तालिबान्यांकडून दावा केला जात आहे की, रजिस्टेंस फोर्स (नॉर्दन अलायंस) चे चीफ कमांडर सालेह मोहम्मद यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी असे म्हटले की, अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांत पूर्णपणे जिंकला आहे. पंजशीर हा अखेरचा प्रांत होता ज्यावर तालिबान्यांकडून कब्जा करण्यात आलेला नव्हता. यापूर्वी 15 ऑगस्टला काबुलवर आपला ताबा मिळवत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर आपले वर्चस्व स्थापन केले.(Afghanistan Crisis: अराजक अफगानिस्तान, सत्तातूर तालिबान; महागाई, रिकामी तिजोरी नव्या सत्ताधीशांसमोर प्रचंड आव्हाने)

रविवाराच्या रात्री पासूनच पंजशीर कमकूवत होऊ लागला होता. रेजिस्टेंस फ्रंटचे प्रवक्ते आणि तालिबानचा मुकाबला करणाऱ्या अहमद मसूदचा जवळचा सहकारी फहीम दष्टी याचाही रविवारी मृत्यू झाला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अफगाणनचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह सध्या अज्ञात ठिकाणी सुरक्षित आहेत. तर असद महमूद गेल्या तीन वर्षांपासून ताजिकिस्तानात आहे.