Afghanistan: तालिबानी दहशतवाद्यांकडून गर्भवती महिला पोलिसावर गोळीबार, नातेवाईकांसमोर केली हत्या
Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

Afghanistan:  अफगाणिस्तान मधील तालिबानी दहशतवाद्यांनी एका शहरातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक मीडिया नुसार, महिलेची ओळख पटली असून तिचे नाव बानू नेगर असे आहे. तिची हत्या मध्य घोर प्रांतची राजधानी फिरोजकोह येथे तिच्या नातेवाईकांच्या समोर घरातच करण्यात आली आहे. या घटनेचा तपशील अद्याप अस्पष्ट आहे, कारण फिरोजकोहमध्ये बरेच लोक प्रतिशोधाच्या भीतीने बोलतात. परंतु तीन सुत्रांनी बीबीसीला सांगितले की, तालिबानने शनिवारी बानू नेगर हिची हत्या तिचा पती आणि मुलाच्या समोरच मारहाण करत हत्या केली.

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, नातेवाईकांनी एका रुमच्या कोपऱ्यातील भिंतीला रक्ताचे डाग आणि शरिराचा थोडा भाग दाखवत व्हिडिओ काढला आहे. त्यामध्ये चेहरा अत्यंत विद्रुप झाला होता. परिवाराचे असे म्हणणे आहे की, स्थानिक जेलमध्ये काम करणारी बानू आठ महिन्यांची गर्भवती होती. तर शनिवारी अचानक तीन जण बंदूका घेऊन घरात घुसत परिवारातील सदस्यांना बांधण्यापूर्वी  तिचा शोध घेतला.(Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने अफगाणिस्थान ताब्यात घेतल्यानंतर आता तेथील विमानतळावर चीनची नजर, भारताची वाढली चिंता)

एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले की, घुसखोर हे अरबी मध्ये बोलत असल्याचे ऐकले. तालिबानने बीबीसीला सांगितले की, नेगर हिच्या मृत्यूशी त्यांचा काही संबंध नाही आहे. या घटनेचा ते तपास करत आहेत. प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने म्हटले की, आम्हाला घटनेबद्दल माहिती असून तालिबान्यांकडून तिची हत्या झाली नसल्याची पुष्टी करत आहोत. आमचा तपास सुरु आहे.

पुढे त्यांनी असे म्हटले की, तालिबानने गेल्या प्रशासनासाठी काम करणाऱ्या लोकांना माफ करण्याची घोषणा केली होती. तर नेगर हिची हत्या की व्यक्तिगत सूड किंवा अन्य काही कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.