Eight Billionth Baby: मनिला येथील टोंडोमध्ये जन्मले प्रतिकात्मक 'आठ अब्जावे बाळ'
Eight Billionth Baby | (Photo Credit: Facebook)

जगाची लोकसंख्या आठ अब्ज इतकी झाली आहे. टोंडो, मनिला (Tondo, Manila) येथे जन्माला आलेली मुलगी ही जगातील आठवी अब्ज व्यक्ती (Symbolic Eighth Billion Person in the World.) प्रतीकात्मक मानली जात आहे. विनिस मबनसाग (Vinice Mabansag) असे या मुलीचे नव आहे. तिचा जन्म डॉ जोस फॅबेला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Dr Jose Fabella Memorial Hospital) सकाळी 1:29 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला. विनिस मबनसाग आणि तिच्या आईचे फोटो फिलीपिन्सच्या लोकसंख्या आणि विकास आयोगाने फेसबुकवर शेअर केले. त्यासोबत या नव्या बाळाच्या जन्माचे स्वागतही केले.

दरम्यान, जागतिक पातळीवर लोकसंख्या एक अब्जने वाढण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागली. आजघडीला चीन हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. दरम्यान, चीनला मागे टाकून लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक गाठण्याच्या उंबरठ्यावर भारत आहे. भारत हा उंबरठा पुढच्याच वर्षी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, 8 Billion World Population: जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर, युनायटेड नेशन्सकडून महत्वपूर्ण माहिती जारी)

फिलीपिन्स कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंटने दुसर्‍या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, टोंडो, मनिला येथे जन्मलेल्या एका लहान मुलीच्या जन्मानंतर जगाने लोकसंख्येचा आणखी एक टप्पा गाठला आहे. बेबी विनिसचे 15 नोव्हेंबर रोजी डॉ. जोस फॅबेला मेमोरियल हॉस्पिटलमधील परिचारिकांनी तसेच लोकसंख्या आणि विकास आयोगाच्या प्रतिनिधींनी स्वागत केले.

ट्विट

युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की जागतिकपातळीवर जगाने गाठलेला लोकसंख्येचा टप्पा हा सार्वजनिक आरोग्यामध्ये मोठ्या सुधारणांचे संकेत देतो. ज्यामुळे मृत्यूचा धोका कमी झाला आहे आणित नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे. परंतु हा क्षण मानवतेने संख्येच्या पलीकडे पाहण्याचा आणि नागरिकांच्या सर्वांगीन गरजांच्या पुर्ततेच्या दृष्टीने आपली जबाबदारी पूर्ण करण्याचे एक आव्हान मानले पाहिजे.

नायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) ने एक महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आठ अब्ज आशा, आठ अब्ज स्वप्नं. आपला ग्रह (पृथ्वी) आता आठ अब्ज लोकांचे घर झाला आहे. आजवरच्या तुलनेत जगाची लोकसंख्या गेल्या दशकात अधिक वेगाने वाढली आहे.