Indian Consulate (Photo Credits : Twitter)

ऑस्ट्रेलियात (Australia) मेलबर्न (Melbourne) येथे विविध देशांच्या दूतवासाला संशयास्पद पाकिट पाठवल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात टेरर अलर्ट जाहीर करण्यात आला असून दूतवास तात्काळ रिकामा करण्यात आला आहे.

कॅनबेरा येथे भारतीय उच्च आयोगाचे कार्यालय उभारण्यात आलेले आहे. परंतु या ठिकाणी संशयास्पद पाकिटे पाठविण्यात आलेली नाहीत. तर प्रसारमाध्यामाच्या माहितीनुसार 10 देशातील दूतवासांना ही संशयास्पद पाकिटे पाठविण्यात आलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हायअलर्ट जाहीर करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तर दूतवासाबाहेर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिन्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून आणि इमर्जन्सी सेवांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच इमर्जन्सी सेवा बजावणारे कर्मचारी केमिकल सूट घालून काही इमारतींमध्ये गेले आहेत. परंतु अद्याप जिवीत किंवा वित्तहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.