Suicide Bombing in Pakistan: पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, बॉम्बस्फोटात पाच चिनी अभियंत्यांचा मृत्यू
Suicide Bombing in Pakistan | Photo Credit - X)

Pakistan Latest News: उत्तर-पश्चिम पाकिस्तान प्रांतात मंगळवारी (26 मार्च) झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये (Suicide Bombing in Pakistan) पाच चिनी (Chinese Nationals) आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला. चीन नागरिक हे अभियंता म्हणून पाकिस्तानमध्ये सक्रीय होते. तर मृत पाकिस्तानी चालक म्हणून काम करत होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील दासू येथील छावणीकडे निघालेल्या चिनी अभियंत्याच्या ताफ्याला बॉम्बरने लक्ष्य केले. स्थानि पोलीस प्रमुख मोहम्मद अली गंडापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेले वाहन हल्लेखोरांनी ताफ्यात घुसवले. ज्यामुळे ही दुर्घटना घडली.

पाकिस्तानातील दासू हे महत्त्वाचे धरण प्रकल्पांचे ठिकाणी आहे. या ठिकाणी आत्मघातकी आणि दहशती हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सन 2021 मध्ये अशाच प्रकारचा आत्मघातकी हल्ला झाला होता. ज्यामध्ये बसमध्ये झालेल्या स्फोटा चिनी नागरिकांसह 13 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानातील चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याची हल्लेखोरांचा मुख्य हेतू असावा असा कयास लावला जात आहे. (हेही वाचा, Pakistan Attack: पाकिस्तानवर पुन्हा हल्ला; दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर माजिद ब्रिगेडकडून गोळीबारासह बॉम्बस्फोट)

दरम्यान, पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या एअरबेस पीएनएस सिद्दिकीवर आगोदरच हल्ला झाला आहे. त्याच्यानंत काहीच कालावधीत चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला होण्याची घटना घडली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अनेक स्फोट आणि गोळीबार केल्याची जबाबदारी स्वीकारलीआहे. दरम्यान, एअरबेस पीएनएस सिद्दीकीवर झालेल्या हल्यात एक निमलष्करी सैनिक ठार झाला आहे. पाकिस्तानच्या बाजूच्या सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सर्व पाच हल्लेखोर ठार झाले. (हेही वाचा: Azam Cheema Dies In Pakistan: लष्कर-ए-तैयबाचा गुप्तचर प्रमुख आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आझम चीमा याचे पाकिस्तानात निधन)

पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुप्तचरांवर आधारित कारवाईदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी किमान चार दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने सांगितले की, डेरा इस्माईल खान जिल्ह्यात सोमवारी या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेकी आणि सुरक्षा जवानांमध्ये जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले.

पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज (PICSS) च्या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये, पाकिस्तानमध्ये 97 दहशतवादी घटना घडल्या, ज्यात 87 मृत्यू आणि 118 जखमी झाले.