Storm in America (फोटो सौजन्य - X/@Mrwaani)

Storm in America: अमेरिकेतील (America) अनेक भागांना वादळाचा (Storm) तडाखा बसला आहे. यामुळे आतापर्यंत येथे किमान 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मिसूरी स्टेट हायवे पेट्रोलने शनिवारी सांगितले की, मिसूरीमध्ये वादळात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमीही झाले आहेत. इंडिपेंडन्स काउंटीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत.

धुळीच्या वादळामुळे झाडे कोसळली -

अर्कांससच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील 16 काउंटींमध्ये घरे तसेच वीज तारा आणि झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. टेक्सास पॅनहँडलमधील अमरिलो काउंटीमध्ये धुळीच्या वादळादरम्यान झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, मिसूरी स्टेट हायवे पेट्रोलने सांगितले की, मिसूरीच्या बेकर्सफील्ड भागात वादळामुळे किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. (Twin Blasts in Pakistan: दारुल उलूम हक्कानिया येथे आत्मघातकी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू, मशिदीत बॉम्बस्फोट, जेयूआय-एफ नेता जखमी)

लोकांना परिसर सोडण्याचा सल्ला -

मिसूरीमधील बटलर काउंटीचे कोरोनर जिम एकर्स यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी बेकर्सफील्डच्या पूर्वेला सुमारे 177 मैल अंतरावर असलेल्या एका घरावर वादळ कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. बचाव पथकांना घरात असलेल्या एका महिलेला वाचवण्यात यश आले. (हेही वाचा, BLA Hijacks Jaffar Express in Pakistan: बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसचे अहपरण; 120 जण ओलिस ठेवल्याचे वृत्त)

दरम्यान, अर्कान्सासच्या केव्ह सिटी भागात पाच जण जखमी झाले आहेत, जिथे पुढील सूचना मिळेपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे, असे महापौर जोनास अँडरसन यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर सांगितले. राज्यभरात 130 हून अधिक आगी लागल्याने ओक्लाहोमाच्या काही समुदायांमधील लोकांना परिसर सोडण्याचा सल्ला देण्यात आला.