कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांच्या पत्नी Sophie Grégoire Trudeau यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान गुरूवार (12 मार्च) ला रात्री उशिरा याबाबतच्या वृत्ताला पंतप्रधान कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान सोफिया या 44 वर्षीय असून बुधवारपासून त्यांना त्रास जाणवायला सुरूवात झाली. दरम्यान सोफिया या नुकत्याच लंडनवरून कॅनडाला परतल्या होत्या. एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी त्या लंडनला गेल्या होत्या. कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातून प्रवक्तांनी दिली आहे. Coronavirus: COVID-19 विषाणू म्हणजे साथीचा आजार- जागतिक आरोग्य संघटना.
दरम्यान Sophie Grégoire Trudeau यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये 'ज्यांनी माझ्या तब्येतीबाबत विचारणा केली, काळजी केली त्यांचे मी आभारी आहे. सध्या मला कोरोना व्हायरसची काही लक्षणं दिसत असली तरीही मी लवकरच त्यावर मात करून पुन्हा उभी राहीन. घरामध्येच इतरांपासून विलग राहताना इतर कॅनडियन फॅमिलीप्रमाणेच माझी स्थिती आहे. ' Coronavirus Outbreak: ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांना कोरोना व्हायरसची लागण; देशात कोरोनाचे एकूण 373 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू.
ANI Tweet
Canadian media: Canadian Prime Minister Justin Trudeau’s wife has been tested positive for Coronavirus. pic.twitter.com/O3ZlJRswTy
— ANI (@ANI) March 13, 2020
कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची सध्या कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ते देखील पुढील 2 आठवड्यांसाठी इतरांपासून वेगळे राहतील अशी माहिती प्रवक्तांकडून देण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेने काल पुढील 30 दिवसांसाठी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी युरोपातून येणार्या प्रवाशांना बंदी घातली आहे. सध्या कोरोना व्हायरसचे जगभरातील रूग्ण 1 लाखापेक्षा अधिक आहे. झपाट्याने वाढत असलेला कोरोना व्हायरसचा धोका पाहता आता WHO ने देखील त्याला जागतिक आरोग्य संकट म्हणून घोषित केले आहे.