Shocking! दररोज बॉर्डर पार करून बांगलादेश मधून मुलगा यायचा भारतात; पकडल्यावर समोर आले धक्कादायक कारण
Chocolates | प्रातिनिधिक प्रतिमा | File Image

आपल्या आजूबाजूला काही घटना अशा घडतात ज्यावर माणूस सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही. त्रिपुराच्या (Tripura) सिपाहिजाला (Sipahijala) जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. या ठिकाणी बांगलादेशमधील (Bangladesh) एका मुलाला लष्कराच्या जवानांनी पकडले, ज्याचे नाव इमाम हुसेन असे आहे. हा मुलगा वैध कागदपत्रांशिवाय भारतात दाखल झाला होता. लष्कराच्या चौकशीदरम्यान मुलाने भारतात येण्याचे कारण सांगितले जे अतिशय विचित्र होते. या मुलाने सांगितले की, आपल्या आवडीचे चॉकलेट (Chocolate) खाण्यासाठी तो रोज एक छोटी नदी पोहून त्यानंतर बॉर्डर ओलांडून अवैधरित्या भारतात प्रवेश करत होता.

भारतामधून आपल्या आवडीचे हे चॉकलेट विकत घेऊन तो परत जायचा. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे चौकशीत मुलानेच सांगितले की, तो येथे पहिल्यांदा आला नसून, तो दररोज ये-जा करत आहे. हा मुलगा तारांच्या मध्ये असलेल्या गॅपमधून निसटून एका नदीत पोहत भारतात यायचा.  त्रिपुरातील कलामचौरा गावातून तो आपल्या आवडीचे चॉकलेट विजात घ्यायचा. सीमा सुरक्षा दलानेही त्याला इथून पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पीटीआयशी बोलताना सोनमुरा एसडीपीओ यांनी सांगितलं की, त्याला न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (हेही वाचा: इम्रान खान यांनी देशाच्या तिजोरीतील भेटवस्तू दुबईला कोट्यावधी रुपयांना विकल्या; PM Shehbaz Sharif यांचा आरोप)

पोलिसांनी इनामची चौकशी केली असता तो बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याने सांगितले की तो बांगलादेशातून दररोज नदी ओलांडत असे आणि त्याच्या आवडीचे चॉकलेट विकत घेऊन परत जात असे. पोलिसांना त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळले नाही. केवळ कागदाशिवाय भारतात आल्याच्या गुन्ह्याखाली त्याला पकडण्यात आले आहे. बीएसएफने अधिक तपास सुरू केला तेव्हा आढळून आले की, केवळ हा एकटाच मुलगा नाही नाही तर अशी इतर अनेक मुलेही नदीमार्गे चॉकलेट आणि वस्तू घेण्यासाठी भारतात येत आहेत.