Shocking! तुरुंगातून चिप्सच्या पॅकेटमध्ये 'Sperm'ची तस्करी; कैद्यांनी दिला 101 हून अधिक मुलांना जन्म
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Facebook)

कारागृहाच्या चार भिंतीत कैद असलेला कैदी (Inmate) बाहेर आपल्या मुलाला जन्म देऊ शकतो? कदाचित नाही. परंतु आता एका दहशतवाद्याने (Terrorist) केलेल्या अशा प्रकारच्या दाव्याने खळबळ माजली आहे. आपण तुरुंगात असताना बाहेर आपल्या पत्नीने आपल्या चार मुलांना जन्म दिला असल्याचे या दहशतवाद्याने सांगितले आहे. रफत अल कारावी (Rafat Al-Qarawi) असे दावा करणाऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. रफत करावी हा धोकादायक पॅलेस्टिनी दहशतवादी आहे. करावी पंधरा वर्षे तुरुंगात होता व बाहेर पडल्यावर त्याने हा दावा केला आहे.

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, या 15 वर्षात दहशतवाद्याने अनेकवेळा चिप्स किंवा बिस्किटांच्या पॅकेटमध्ये आपल्या शुक्राणूंची (Sperm) तस्करी केली होती. शुक्राणू शरीरातून बाहेर पडल्यावर फार काळ टिकत नाहीत. असे असतानाही तो पिशवीतून शुक्राणू तुरुंगातून बाहेर पाठवत असे, असा त्याचा दावा आहे. अशाप्रकारे कारागृहात कॅन्टीनच्या वस्तूंद्वारे शुक्राणूंची तस्करी करण्याचा धंदा सुरू होता.

पॅलेस्टिनी कैदी त्यांच्या कुटुंबासाठी पाच वस्तू तुरुंगाबाहेर पाठवू शकतात. या प्रकरणात, कैदी अनेकदा त्यांच्या कुटुंबातील मुलांसाठी अन्न, इतर खायच्या गोष्टी आणि भेटवस्तू इत्यादी पाठवतात. तर शुक्राणू गोळा केल्यानंतर, ते पाऊचमध्ये ठेवले जातात आणि ते उघडता येणार नाहीत अशा प्रकारे पॅक केले जातात. ही  बॅग सुपरमार्केटच्या शॉपिंग बॅगसारखी दिसत असे. त्यामुळेच त्यावर तुरुंगातील कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्याने संशय घेतला नाही.

करावी सांगतो. ‘अनेकदा माझी पत्नी किंवा आई तुरुंगातून शुक्राणू असलेली ती पिशवी घ्यायला यायची. तुरुंगातून बाहेर आणलेली स्पर्म बॅग थेट रझान मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात येत असे. जिथे तज्ज्ञांच्या मदतीने दात्याचे शुक्राणू महिलेच्या गर्भाशयात सुरक्षित करण्यात येत असत.’ या युक्तीने इथल्या कैद्यांनी सुमारे 101 मुलांना जन्म दिला आहे. (हेही वाचा: महिलेने केले असे कृत्य की, पतीचा Private Part झाला खराब; आता कधीच करू शकणार नीही सेक्स!)

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, रफत अल करावी हा अल अक्सा शहीद ब्रिगेडचा खतरनाक दहशतवादी होता. 2006 मध्ये इस्रायलविरुद्ध दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर तो मार्च 2021 मध्ये म्हणजे गेल्या वर्षीच तुरुंगातून बाहेर आला होता.