Sexual Abuse by Archbishop: नोबेल पारितोषिक मिळालेल्या बिशपने केले लहान मुलांचे लैंगिक शोषण; पैसे देऊन करत असे Oral Sex- Reports
Carlos Filipe Ximenes Belo (संग्रहित संपादित प्रतिमा)

नोबेल पारितोषिक विजेता व डिलीचे (Dili) तत्कालीन आर्चबिशप कार्लोस फिलिप जिमेनेझ बेलो- वय 75 (Carlos Filipe Ximenes Belo), याच्यावर लैंगिक अत्याचाराचा (Sexual Abuse) आरोप करण्यात आला आहे. व्हॅटिकनकडून याची चौकशी केली जाणार आहे. बिशपच्या सेक्स स्कँडलबाबत एका डच मॅगझिनमध्ये अहवाल प्रसिद्ध झाला आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देश पूर्व तिमोरमध्ये (East Timor) बिशप म्हणून काम करत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 1980 आणि 90 च्या दशकात राजधानी डिलीमध्ये अनेक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मासिकाने आपल्या अहवालात काही पीडितांची विधाने देखील प्रकाशित केली, ज्यांनी सांगितले की बिशप कार्लोस फिलिप जिमेनेस बेलो याने त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्या बदल्यात पैसे दिले. ही मुले त्यावेळी किशोरवयात होते आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरीब होती. याबाबत ते बोलण्यास घाबरत असल्याचे पीडित मुलांनी सांगितले. पूर्व तिमोरचे हे कॅथोलिक चर्च तेथील लोकांमध्ये अतिशय आदरणीय आहे, म्हणूनच ही बाब समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

वृत्तपत्रानुसार, पूर्व तिमोरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2002 मध्ये पहिल्यांदा हे आरोप समोर आले होते, परंतु ते सार्वजनिक केले गेले नाहीत. आर्चबिशपने त्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये, आरोग्याच्या कारणास्तव पद सोडले आणि पोर्तुगालला स्थलांतरित झाले, जिथे तो सेल्सियन्ससोबत राहू लागला. 'डी ग्रोएन अॅमस्टरडॅमर' (De Groene Amsterdammer) या मासिकाने बिशप बेलो यांना या आरोपांबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता, त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही.

एका पीडितेने सांगितले की, त्याला या घटनेबद्दल चर्च आणि बिशप कार्लोस फिलिप जिमेनेस बेलो यांच्याकडून माफी हवी आहे. ही घटना सर्वांसमोर यावी आणि भविष्यात सत्तेच्या नशेत कोणीही अशी लैंगिक हिंसा करू नये, अशी आपली इच्छा असल्याचे तो म्हणाला. पीडितांबाबत जे काही झाले त्याबद्दल चर्च आणि आरोपीने खेद व्यक्त केला पाहिजे, असेही पीडितांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Gay Sex Party साठी पादरी येडापीसा, Drugs खरेदीसाठी 86 लाख रुपयांवर डल्ला, थेट अटक)

एका 42 वर्षीय पीडितेने सांगितले की, बिशपने त्याला नग्न करून, त्याच्यासोबत मुखमैथुन केला. व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. बिशपवर व्हॅटिकनने प्रवासाचे निर्बंध लादले आहेत आणि परवानगीशिवाय त्याला पूर्व तिमोरला परत येता येऊ शकत नाही. बेलोला 1996 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.