Gay Sex Party साठी पादरी येडापीसा, Drugs खरेदीसाठी  86 लाख रुपयांवर डल्ला, थेट अटक
Gay Relationship | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

'गे सेक्स पार्टी' ( Gay Sex Party) करण्यासठी उतावीळ होणे एका पादरीला चांगलेच महागात पडले आहे. या पादरीने 'गे सेक्स पार्टी'साठी अंमली पदार्थ (Drugs) खरेदी करण्यासाठी चर्चमधून तब्बल 85,000 पाउंड (86 लाख रुपये) चोरल्याचा आरोप आहे. हा पादरी (Priest) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अटक झाली आहे. फादर फ्रांसेस्को स्पागनेसी (Father Francesco Spagnesi) असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव आहे. हा पादरी फ्लोरेन्स जळील प्रेटो चर्च येथे कार्यरत होता. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार इटलीमधील या पादरीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटशी संबंधीत शेकडो लोकांची चौकशी केली आहे. सांगितले जात आहे की, फादर फ्रांसेस्को स्पागनेसी हाच 'Gay Sex Party' चा आयोजक होता. त्याने आपल्या घरीच पार्टीचे आयोजन केले होते. पोलिसांनी म्हटले आहे की, ड्रग्जचे नेटवर्क पाठिमागील दोन वर्षांपासून कार्यरत होते. या नेटवर्कमध्ये पार्टीचे आयोजन करणारा पादरी आणि पार्टीमध्ये ड्रग्जचे डीलिंग करणारा एक फ्लॅटमेट यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश होता. पार्टीत समावेश होण्यासाठी हे लोक 'गे-डेटिंग' साईटवरुन ग्राहक शोधत असत. यांनी आयोजित केलेल्या साप्ताहिक पार्टीमध्ये जवळपास 20 ते 30 लोक सहभागी होत असत. पोलिसांना संशय आहे की, अनेक पार्ट्यांमध्ये लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असावेत.

फादर स्पागनेसी हा पोलिसांच्या रडारवर तेव्हा आला जेव्हा त्याने फ्लॅटमेटसाठी नीदरलँड येथून एक लीटर 'GHB' मागवले. या व्यवहाराबाबततीत जेव्हा पोलिसांना समजले तेव्हा त्यांनी त्याच्यावर बारीक नजर ठेवली. नंतर त्याची चौकशी सुरु केली. GHB ला 'डेट रेप ड्रग्ज' नावानेही ओळखले जाते. कारण जेव्हा एखादा व्यक्ती GHB घेतो तेव्हा तो पूर्णपणे नशेच्या अंमलाखाली जातो. त्यानंतर त्याच्यासोबत होणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेस तो विरोध करत नाही. त्यामुळे सोबतच्या व्यक्तीस त्याच्यासोबत काहीही करता येते.

पोलिसांना संशय आहे की, पादरीने ड्रग्ज खरेदी करणयासाठी चर्चमधील पैसे चोरले असावेत. पोलिसांनी जेव्हा गे पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटवर छापा मारला तेव्हा त्यांना ड्रग्जचे छोटे छोटे पॅकेट मिळाले. या फ्लॅटमध्ये ड्रग्जचे वाटप केले जात असावे असा पोलिसांना संशय आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चच्या अकाऊंटमधून 86 लाख रुपये गायब झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांना संशय आहे की, स्पागनेसी यानेच पैशात काही अफरातफर केली असावी. चर्चच्या खात्यातून गायब झालेले पैसे, ड्रग्ज आणि गे पार्टी अशा सर्व प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.