Sex Slavery Contract: सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) टेक कंपनी 'ट्रेडशिफ्ट'चा (Tradeshift) माजी सीईओ ख्रिश्चन लँग (Christian Lanng) याच्यावर त्याच्या महिला सहाय्यकाने गंभीर आरोप केले आहेत. महिलेने दावा केला आहे की, लँगने तिला एका ‘लैंगिक गुलामगिरी’ करारावर स्वाक्षरी करायला लावून तिच्यावर अनेक वर्षे लैंगिक छळ केला. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, लॅन्गने महिलेला कार्यकारी सहाय्यक म्हणून कामावर घेतल्यानंतर काही महिन्यांतच नऊ पृष्ठांच्या गुलामगिरी करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये पीडितेचे नाव जेन डो असे आहे. या कराराच्या माध्यमातून अनेक वर्षे आपल्यावर बलात्कार होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेने सांगितले की, तिला विविध प्रकारे शारीरिक वेदना दिल्या जात होत्या. कधी तिच्यावर लघवी करण्यात आली, तर कधी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वस्तू टाकण्यात आल्या.
करारानुसार ही महिला ‘सेक्स गुलाम' तिच्या मालकाला जेव्हा-जेव्हा सेक्सची गरज भासेल, तेव्ह=तेव्हा त्याला लैंगिक सुख देण्यासाठी उपलब्ध असायची. ती त्याला नकार देऊ शकत नव्हती. महिलेला सेक्स गुलाम बनवून दिल्या जाणाऱ्या शिक्षेचाही उल्लेख करारात होता. त्यात मालक गुलामाला वाट्टेल ती शिक्षा देऊ शकतो, असे लिहिले होते. पण शिक्षा देताना तो महिलेला मारणार नाही किंवा तिला कायमची दुखापत करणार नाही ही जबाबदारी मालकाची होती. इतकेच नव्हे तर, तिने काहीही केले तरी या शिक्षा मिळाल्यानंतर गुलाम रागावू शकत नाही किंवा ती तिच्या मालकावर नाराजी व्यक्त करू शकत नाही, असेही करारात नमूद केले होते. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: यूपीहून येणाऱ्या बसमध्ये दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक)
महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, लँगने तिला रक्त निघेपर्यंत मारहाण केली आणि निर्जीव वस्तूंनी तिचा छळ केला. तिने नेहमी व्यवस्थित कपडे घातले पाहिजे आणि तिने तिचे वजन 130 ते 155 पौंडांच्या दरम्यान ठेवावे, असेही करारात नमूद करण्यात आले होते. याशिवाय, गुलामाने प्रत्येक प्रकारे आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. त्याचे शरीर मालकाचे असले पाहिजे, असेही त्यात म्हटले होते.