आज 21 व्या शतकात लग्नविधींमध्ये अनेक बदल झालेले पहायला मिळाले आहेत. आजची तरूण पिढी अनेक जुन्या रूढी-परंपरांना छेद देत नवा पायंडा पाडत आहे. यामध्ये मुलीच्या घरच्यांकडून मुलाचे पाय धुण्याचे विधी टाळण्यापासून ते अगदी महिला पंडितांकडून लग्न विधी लागणं, नवरमुलाने सिंदूर लावणं, नवरीची घोड्यावरून एंट्री असे प्रकार पहायला मिळाले आहेत पण सध्या इंटरनेट वर वायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये जोडपं एक 'करार' स्वाक्षरी करत असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. काहीजण त्याच कौतुक करत आहेत तर काही जण टीका करत आहे. पण हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नक्की पहा: Maharashtrian Bridal Entry in Nagpur: नागपूरात लग्नमंडपात नवरीने 'आली ठुमकत नार लचकत' गाण्यावर केली जबरदस्त एंन्ट्री; Watch Viral Video .
Wedlock Photography Assam या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये वधू शांती आणि वर मिंटू हा एक वेडिंग कॉन्ट्रॅक्ट वर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. यामध्ये dos and don'ts ची यादी आहे. करारामध्ये महिन्याला एक पिझ्झा, 15 दिवसांतून एकदा शॉपिंगचा समावेश आहे.
पहा व्हीडिओ
View this post on Instagram
सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करताना आपल्या भावी साथीदाराला टॅग करत आपला मनसुबा देखील पूर्ण करण्याचा प्लॅन आखला आहे.