Uttar Pradesh Shocker: यूपीहून येणाऱ्या बसमध्ये दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक
Stop Rape (Representative image)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) येत असलेल्या एका चालत्या बसमध्ये 20 वर्षीय दलित महिलेवर दोन चालकांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 आणि 10 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. यावेळी ही खाजगी बस उत्तर प्रदेशातून जयपूरला जात होती. कानपूरहून जयपूरला जाणारी पीडित महिला केबिनमध्ये बसली होती.

केबिनमध्ये आरिफ आणि ललित नावाच्या चालकांनी तिच्यावर बलात्कार केला. कनोटा पोलीस ठाण्याचे एसएचओ भगवान सहाय मीना यांनी सांगितले की, आरिफला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. (हेही वाचा -Jabalpur Man Shoots Woman: जबलपूरमध्ये नाईट वॉकला गेलेल्या महिलेची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

ललित पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे, असेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) यांनी सांगितले की, बसमध्ये काही प्रवासी होते. मात्र, पीडित महिला केबिनमध्ये बसली होती. केबिनचा दरवाजा आतून बंद होता. (हेही वाचा - Acid Attack In Rajastan: लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीवर फेकला अॅसिड, आरोपीला अटक)

दरम्यान, ही घटना घडल्यावर महिलेने आरडा ओरड केला. ज्यामुळे प्रवासी सावध झाले आणि त्यांनी बस थांबवली. यानंतर आरोपी आरिफला पकडण्यात आले. परंतु, ललित नावाचा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.