Jabalpur Man Shoots Woman (PC - Twitter/@FreePressMP)

Jabalpur Man Shoots Woman: जबलपूरच्या (Jabalpur) गोटेगाव (Gotegaon) येथे गुरुवारी रात्री नाईट वॉकला गेलेल्या महिलेची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा समोर आला नसून त्याचा शोध सुरू आहे. 20 वर्षीय काजल साहू असे मृत महिलेचे नाव असून ती गोटेगाव येथील रहिवासी आहे.

काजल जबलपूर येथे नोकरीला होती. सीसीटीव्ही फुटेजमधून ही घटना उघडकीस आली असून त्यात एक पुरुष महिलेच्या शेजारी फिरताना दिसत आहे. काही मिनिटांनंतर दोघेही कॅमेऱ्याच्या दृश्यातून बाहेर पडले तेव्हा आरोपीने महिलेवर गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. (हेही वाचा -Uttar Pradesh Horror: उत्तर प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना; वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याला शाई फासत गळ्यात चपलांचा हार घालून गावात काढण्यात आली धिंड; Watch Video)

जबलपूरच्या गोटेगाव येथील सिंधी कॉलनीतील शीतल धर्मशाळेजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मृत काजल नुकतीच अमरावती एक्स्प्रेसने जबलपूरहून आपल्या गावी परतली होती. गुरुवारी रात्री उशिरा ती फिरायला बाहेर पडली असताना एका व्यक्तीने तिच्यावर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला. (वाचा - (हेही वाचा -Viral Video: महिलेचा धोबीपछाड! घरी उशिरा आल्याने पतीला चोपलं; व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, या हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून जबलपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस घटनेतील आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.