दावोस (Davos) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) ची पाच दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी संपली. या कालावधीत, जागतिक उद्योजकांकडून 20 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक वचनबद्धता मिळवण्यात भारत यशस्वी झाला, ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा सुमारे 80 टक्के होता. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह आजवरच्या सर्वात मोठ्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. मात्र आता या बैठकीशी संबंधित एका अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे.
दावोस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकांसाठी प्रसिद्ध आहे. डब्ल्यूइएफच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील आघाडीचे व्यापारी, उद्योगपती आणि धोरणकर्ते एकत्र येतात. जग आणि अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. याशिवाय गुंतवणुकीबाबतही मोठे निर्णय घेतले जातात. या दावोससंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दावोसमध्ये सेक्स पार्ट्या (Sex Parties), ऑर्जीज (Orgies) आणि एस्कॉर्ट्सवर जागतिक स्तरावरील उच्चभ्रूंनी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले आहेत.
वृत्तानुसार, दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींद्वारे सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्शुअल महिलांना खूप मागणी होती. हा खुलासा एस्कॉर्ट एजन्सीने केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या मंचासाठी जगभरातील 3,000 हून अधिक व्यापारी आणि राजकीय नेते दावोसमध्ये आले होते. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, डब्ल्यूईएफ परिषदेत सहभागी होण्यासाठी दावोसला गेलेल्या लोकांनी सेक्सवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. एस्कॉर्ट एजन्सींनी सांगितले की, लोकांची गुपिते उघड होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी, नॉन-डिक्लोजर करारावर स्वाक्षरी केली जात होती. (हेही वाचा: Online Sexual Exploitation and Abuse: इंटरनेट मुलांसाठी धोकादायक; जगभरातील 12 पैकी 1 मूल ठरत आहे ऑनलाइन लैंगिक छळाचा बळी- Study)
दावोसमध्ये कॉन्फरन्स सुरू झाल्यामुळे सेक्स पार्ट्यांची मागणीही वाढली आहे. अशा पार्ट्या नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. Titt4tat नावाच्या एजन्सीचे प्रवक्ते Andreas Burgers यांनी सांगितले की, इथे परिषद सुरू झाल्यापासून सुमारे 300 महिला आणि ट्रान्सवुमनचे बुकिंग झाले होते. गेल्या वर्षी ही संख्या 170 होती. रिपोर्टनुसार, एका बुकिंगसाठी 6000 पौंडदेखील (6.45 लाख रुपये) मोजले गेले आहेत. साधारणपणे भारतातील कोट्यावधी लोकांचे वार्षिक उत्पन्न इतके आहे. सरासरी बुकिंग कालावधी चार तासांचा होता. या ठिकाणी इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच मुलींना जास्त मागणी आहे.