Coronavirus संसर्गाच्या भीतीमुळे चीनी, अमेरिकन, ब्रिटीश आणि टर्कीश लोकांमध्ये सेक्सचे प्रमाण झाले कमी- Survey
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) हाहाकार माजविला असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल डिस्टंसिंग Social Distancing) चे पालन न केल्याने आणि एकमेकांच्या संसर्गामुळे या विषाणूची लागण झपाट्याने होताना दिसत आहे. यामुळे सुरक्षेचा उपाय आणि खबरदारी म्हणून जगातील अनेक देशांतील लोकांनी शारीरिक संबंध ठेवणे कमी केले आहे असे सर्वेक्षणात समोर आले आहे. एका सर्वेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून चीनी (Chinese), टर्किश (Turkish), अमेरिकन (Americans) आणि ब्रिटीश (British) लोकांनी सेक्स करण्याचे प्रमाण कमी केले आहे.

कोरोना व्हायरसच्या काळात स्वत:ची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे. या सोबत अमेरिकेच्या एका डेटिंग अॅपवर असेही समोर आले आहे की मार्च ते ऑक्टोबर महिन्यात अविवाहित असलेल्या अनेक अमेरिकन्स सेक्स केलेला नाही. त्याचबरोबर सर्वेमध्ये असेही आढळून आले की सध्या अनेक जोडपी ही वर्क फ्रॉम होम करत आहे. यामुळे घरात त्यांच्यामधील तणाव वाढल्याने देखील एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवणे कमी झाले आहे. हेदेखील वाचा-Sex During Coronavirus: कोरोना व्हायरसच्या काळात Sex Dolls च्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ; जाणून घ्या Blow up ते Silicone सेक्स डॉलचे प्रकार आणि त्यांची माहिती

लॉकडाऊनमुळे अनेक जण घरात असल्यामुळे आपापसातील ताणतणावाचा सेक्स वर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. टर्की मध्ये झालेल्या सर्वेमध्ये असे आढळून आले आहे की, लॉकडाऊनच्या काळात लग्नाआधी सेक्स आणि फॅमिली प्लॅनिंगसाठी सेक्स करणे या गोष्टी देखील कमी झाल्या आहेत. तर यामुळे स्त्रियांमध्ये गर्भधारणा होऊ शकते. यामुळे लोक सेक्स करणे टाळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही देशात सरकारने सुरक्षित सेक्स करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे सेक्स मुळे होणारा कोरोनाचा संसर्ग टाळता येईल. मात्र तरीही लोकांनी खबरदारी म्हणून सेक्स करणे टाळले आहे.

तर चीनमधील लोकांना सेक्स टाळणे हाच लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरसपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग आहे असे वाटत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांची संभोग करणा-या जोडीदारासोबतचे नाते देखील तुटले आहे असेही तपासात आढळून आले आहे.