पाकिस्तान FATF कडून 'ब्लॅक लिस्ट'; आर्थिक कोंडीमुळे 'कंगालिस्तान' होण्याची शक्यता
इमरान खान (Photo Credits: Facebook)

Setback to Pakistan: फाइनैंशल ऐक्शन टास्क फोर्स (FATF) च्या एशिया पेसिफिक ग्रुप (APG) विभागाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. FATF ही आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि त्याच्या आर्थिक जाळ्यावर बारीक लक्ष ठेवते. सुरुवातील FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. मात्र, त्यातूनही पाकिस्तानची घसरण करत या देशाला थेट काळ्या यादीतच टाकले आहे. दहशतवादाला पाठिंबा देणे आणि त्यास आर्थिक मदत करणे या कारणामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. उत्तर कोरिया, ईरान या देशांनतर FATF कडून 'ब्लॅक लिस्ट' होणारा पाकिस्तान हा तिसरा देश आहे. स्वातंत्र्यानंतर भारताशी सातत्याने युद्धखोरी आणि संघर्षाच्या पवित्र्यात राहणारा पाकिस्तान गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या याच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. ज्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी या देशाची स्थिती झाली आहे.

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे आयोजित करण्यात आलेल्या FATF च्या एशिया पेसिफिक ग्रुप (APG) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आधीर FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, एफएटीएफच्या एशिया प्रशांत ग्रुपने जागतिक नियम आणि संकेतांची पूर्तता न केल्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले. एफएटीएफला आढळून आले की मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना मदत आदी गोष्टींशी संबंधीत 40 मानकांपैकी 32 मानके पाकिस्तानने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे FATF ने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले. (हेही वाचा, पाकिस्तानमध्ये महागाई दर गगनाला भिडला, 'बकरी ईद'चा उत्साह मावळला; भारतासोबत व्यापार संबंध तोडल्याचा परिणाम)

एफएटीएफ च्या एशिया पेसिफिक ग्रुपच्या काळ्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता पाकिस्तानची ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. फाइनैंशल ऐक्शन टास्क फोर्सने शुक्रवारी म्हटले की, पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या आराखड्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. अमेरीकेतील फ्लोरिडा येथील ओरलँडो येथे आयोजित बैठकीत एफएटीएफने चिंता व्यक्त केली की, 'पाकिस्तान केवळ जानेवारीपर्यंतच्या समयसीमेपर्यंतच आपल्या आराखड्यात अयशस्वी ठरला नाही तर, मे 2019 पर्यंतही पाकिस्तान हा आराखडा राबविण्यात अयशस्वीच ठरला.' (हेही वाचा, Jammu - Kashmir Issue : जम्मू-कश्मीर प्रश्नी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार: वृत्तसंस्था)

ब्लॅकलिस्ट होण्याचा पाकिस्तानवर आर्थिक परिणाम काय?

एफएटीएफने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर पाकिस्तानवर आर्थिकदृष्ट्या प्रचंड परिणाम होणार आहे. या ब्लॅक लिस्टचा परिणाम असा की, पाकिस्तान हा देश दहशतवाद विरोधी लढाईत सहकार्य करत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता वर्ल्ड बैंक, आईएमएफ, एडीबी, यूरोपियन यूनियन यांसारख्या जागतीक आणि विदेशी संस्थांकडून कर्ज मिळणे कठीण होणार आहे. याशिवाय मूडीज, स्टँडर्ड अँण्ड प्यूअर आणि फिच यांसारख्या एजन्सींमध्येही पाकिस्तानचे स्थान घसरणार आहे. एफएटीएफ सन 2000 पासून दहशतवाद विरोधी कारवाईत सहभागी न होणाऱ्या देशांना काळ्या यादीत टाकत आला आहे.