सौदी अरेबिया (Saudi Arabia) जगातील सर्वात मोठी इमारत बांधण्याचा विचार करत आहे. त्यासाठी 500 अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षीत आहे. फारशी घनदाट लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचा सौदी अरेबियाचा विचार आहे. हा प्रकल्प सौदी अरेबिया NEOM नावाने लॉन्च करण्याची शक्यता आहे. NEOM हा प्रकल्प खरेतर सौदीचा राजा (Saudi Crown Prince) आणि शासक मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांच्या मनातील ही संकल्पना आहे. ज्यात जवळपास 500 मीटर (1,640 फूट) उंच अशी दुहेरी गगनचुंबी इमारत उभारण्याच्या विचार आहे. जी इमारत जवळपास एक डजन मैल इतक्या प्रदीर्घ जमीनवर उभी असेल.

सौदीतील या गगनचुंबी इमारतीत संमिश्र स्वरुपाची लोकवस्ती असेल. म्हणजेच ज्यात दुकाने, कार्यालये आणि निवासी सदनिकाही असतील. म्हणजेच इथे कार्यालये, व्यवसाय आणि रहिवासी अशा सर्व प्रकारच्या नागरिकांना राहता येईल. इथे राहणारे लोक तांबड्या समुद्र किनारपट्टीपासून ते वाळवंटी प्रदेशातीलसुद्धा असतील. सर्वांना सयुक्तीक अशी ही इमारत असेल. (हेही वाचा, World's Oldest Person Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

NEOM चे आजी माजी कर्मचारी सांगतात की, इथे काम करणाऱ्या अभियंत्यांना जवळपास अर्धा मैल लांबीच्या प्रकल्पावर काम करण्यास सांगितले आहे. या प्रकल्पावर ते जर बिनचूक आणि निर्धोकपणे पुढे गेले तर ते एक जगातील सर्वात मोठी इमारत उभारतील. ज्यात सर्व प्रकारचे लोक राहताना पाहायला मिळेल.