70-Year-Old Ugandan Woman Welcomes Twins: युगांडा (Ugandan) येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथील सफीना नामुकवाया (Safina Namukwaya) नामक महिलेने चक्क वयाच्या 70 व्या वर्षी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. ज्यामुळे ती आफ्रिकन देशांतील सर्वात वयस्कर आई (Africa's Oldest Mother) ठरली आहे. बाळ आणि बाळंतीन असे तिघेही सुखरुप आहेत. जन्माला आलेल्या बाळांमध्ये मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. युगांडा देशातील कंपाला येथील एका रुग्णालयात नामुकवाया यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. या अतिशय धक्कादायक आणि तितक्याच आश्चर्यकारक प्रसुतीची वैद्यकीय वर्तूळ आणि संबंध जगभरात चर्चा सुरु आहे.
बाळ बाळंतीन यांची प्रकृती उत्तम
महिला रुग्णालय आंतरराष्ट्रीय आणि प्रजनन केंद्राचे संस्थापक डॉ. एडवर्ड तामाले साली यांनी या अभूतपूर्व गर्भधारणा आणि प्रसूतीचे पर्यवेक्षण केले. त्यांनी पुष्टी केली की आई आणि नवजात, दोघेही सध्या वैद्यकीय सुविधेच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. सर्वांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आणि उत्तम आहे. (हेही वाचा, Amravati Woman Gives Birth Quadruplets: महिलेने एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म, सोनोग्राफी नसल्याने डॉक्टरांपुढे संभ्रम, अमरावती येथील घटना)
वयाच्या 70 व्या वर्षी सामाजिक आक्षेप आणि चालिरितींना धक्का
कंपाला येथून पश्चिमेस जवळपास 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मसाका या ग्रामीण भागात राहणार्या नामुकवायाने सर्व सामाजिक आक्षेप आणि चालिरितींना धक्का दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे गर्भधारणा आणि बालसंगोपनासाठी आव्हानात्मक मानल्या जाणार्या वयात त्यांनी या आधीही सन 2020 मध्ये यापूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. वैद्यकीय आणि मानवी प्रसूतीच्या इतिहासात हा एक चमत्कार मानला जात आहे. (हेही वाचा, भारतात प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येण्याची संख्या जास्त, अभ्यासातून आले समोर)
IVF तंत्राच्या मदतीने गर्भधारणा
सफीना नामुकवाया यांचे आयुष्य प्रचंड संघर्षमय राहिले आहे. त्यांचे खूप लहान वयात लग्न झाले. मात्र, वैवाहिक जीवनामध्ये त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. सन 1992 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्तीचा आनंदच घेता आला नाही. दरम्यान, त्यांच्या आयुष्यात एक प्रियकर आला. नामुकवाया यांना IVF तंत्राच्या मदतीने गर्भधारणा झाली. या तंत्राच्या मदतीने त्या आई झाल्या. पतींचे निधन झाल्यानंतर त्या बराच काळ एकट्या राहिल्या होत्या. (हेही वाचा, Twins Baby: ऐकावं ते नवलचं! जुळ्या बाळांचे दो-दो बाप, दोन्ही बाळांची आई एक मात्र वडिल वेगवेगळे)
व्हिडिओ
दरम्यान, बाळाला जन्म दिल्याबद्दल आई म्हणून नामुकवाया आनंदी आहे. मात्र, या वयातही इतक्या गोंडस बाळांना जन्म देऊनही त्यांचा जोडीदार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आला नाही. याबद्दल त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, अशा वयात बाळ जन्माला येणे सामाजिक संकेतांनुसार अनेक पुरुषांसाठी काहीशी अवघडलेबणाची स्थिती निर्माण करु शकते. समाजामध्ये असा गोष्टींबद्दल काहीसे चुकीच्या अर्थाने घेतले जाते. त्यामुळेच जोडीदार कदाचित भेटण्यासाठी आला नसेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.