Woman Gives Birth Quadruplets at Dharni: अमरावती (Amravati) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे खुद्द डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत. येथील दुनी येथे एका महिलेने म्हणे एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. आजपर आपण जुळे, तिळे ऐकले आहे. पण, एकाच वेळी चार मुलांना जन्म ही महाराष्ट्रातील दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. एकाच वेळी जन्माला आलेली ही चारही बाळं मुली आहेत. बाळं आणि बाळंतीन सुखरुप आहेत. मुलींचे वजन काहीसे कमी अलल्याने त्यांना आपल्या मातेसह धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
महिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. मात्र महिलेची सोनेग्राफी केल्याचे कोणतेही कागदपत्र अथवा नोंद उपलब्ध नसल्याने डॉक्टरही काहीसे संभ्रमात आहे. पपिता बळवंत उईके असे या महिलेचे नाव आही. ती 24 वर्षांची आहे. सदर महिलेने काल (12 जुलै) सकाळी बाळंतकळा सुरु झाल्या. त्यामुळे तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे महिला बाळंत झाली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या महिलेबद्दल विशेष माहिती नव्हती. त्यांच्याकडे तिचे फार रेकॉर्डही नव्हते. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे प्रसुती करायला घेतली. एका बाळाने जन्म दिला. पण डॉक्टरांना संशय आला की आणखी एक बाळ असावे. म्हणून त्यांनी काही काळ वाट पाहून प्रसुती सुरु केली. दुसऱ्या बाळाने जन्म दिला. असे करता करता महिलेने चार बाळांना जन्म दिला. (हेही वाचा, भारतात प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येण्याची संख्या जास्त, अभ्यासातून आले समोर)
दरम्यान, एकापेक्षा अधिक बाळांना महिलांनी जन्म दिल्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. सर्वाधिक बाळांना जन्म देण्याचा विक्रम मोरक्कोच्या हलीमा सिसे या महिलेच्या नावावर आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हलीमा सिसे या महिलेने एकाच वेळी नऊ (9) बाळांना जन्म दिला आहे. भारतात सर्वाधिक मुले जन्माला घालण्याच विक्रम झारखंडमधील अंकिता कुमारी नावाच्या महिलेच्या नावावर आहे. अंकिता कुमारी हिने रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये 22 मे रोजी दुपारच्या सुमारास एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिल्याची नोंद आहे.