Russian Election 2024: मतदानावेळी बॅलेट पेपरवर 'नो टू वॉर' लिहिल्याबद्दल रशियन महिलेला तुरुंगवास
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Russia Jails Women For Writing No War: रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक (Russian Election 2024) नुकतीच पार पडली. ज्यामध्ये व्लादिमीर पुतीन तब्बल 85% मते घेऊन विजयी झाले. प्रबळ विरोधक नसल्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्षांचा विजय झाला असला तरी युक्रेन-रशिया युद्धाचा प्रभाव या निवडणुकीवर पाहायला मिळाला. केवळ पाहायलाच मिळाला नाही तर त्याबाबत मत नोंदविल्याने अलेक्झांड्रा चिर्यात्येवा नावाच्या एका महिलेला चक्क तुरुंगवास भोगावा लागला आहे. या महिलेवर आरोप आहे की, तिने मतदानावेली बॅलेट पेपरवर 'नो टू वॉर' असे लिहिले होते.

सेंट पीटर्सबर्ग येथील महिलेला बॅलेट पेपरवर नो टू वॉर लिहील्याबद्दल चक्क आठ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.पाचव्या क्रेमलिन टर्मसाठी पुतिन यांच्यासमोर कोणतेही आव्हान नसलेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानावेळी हे घडले आहे. अलेक्झांड्रा चिर्यात्येवा हिस झालेल्या शिक्षेमुळे या प्रकरणाके जगाचे लक्ष वेधले गेले आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Congratulates Vladimir Putin: रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा निवडीबद्दल पुतीन यांचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन वरून केलं अभिनंदन!)

सेंट पीटर्सबर्गच्या झेर्झिन्स्की जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय रशियातील सध्यास्थिती दर्शवतो. अलेक्झांड्रा चिर्यात्येवा हिच्यावर न्यायालयात पोलिसांनी आरोप ठेवले की, तिने गुन्हेगारी वर्तन केले तसेच रशियन सशस्त्र दलांना बदनाम केले. कोर्टाने पोलिसांचे आरोप ग्राह्य मानत महिलेला दोषी ठरवले. तिला आठ दिवसांचा तुरुंगवास आणि 40,000 रूबल ($440 युरो) दंड ठोठावला. सोबतच आपल्या निर्णयात महिलेच्या कृतीमुळे राज्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि देशाची लष्करी प्रतिष्ठा कमी झाली, असे ताशेरेही ओढले. (हेही वाचा, Alexei Navalny: ॲलेक्सी नवलनी यांच्या समर्थक गटाकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी; मृतदेह अद्यापही गायब)

न्यायालयाच्या नोंदीनुसार, चिरत्येवा यांनी मतदान केल्यावर बॅलेट पेपर मतपेटीमध्ये जमा करण्यापूर्वी त्यावर लाल मार्कर वापरून "नो टू वॉर" संदेश लिहीला. ज्यामुले मतदानाची मतपत्रिका विकृत झाली. महिलेची ही कृती मतदानाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये घडली. पुतिन यांच्या बिनविरोध उमेदवारीमुळे काही गटांनी त्यांना विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, रशियाच्या 15-17 मार्चच्या निवडणुकांचे निकाल हे एक उघड गुपीत होते. मतदानाच्या पहिल्या मतदानापूर्वीच सर्वांना माहीत होते. अनेक वर्षे अध्यक्षपद भूषवलेल्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा विजय होताना मतदानाचा अधिकृत आकडा किती एवढीच काय ती उत्सुकता होती. सोमवारी, रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने (CEC) निकाल जाहीर करताना सांगितले की, पुतिन यांना जवळपास 88% मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट पक्षाचे निकोले खारिटोनोव्ह यांना 4.31% मते मिळाली आहेत. सीईसी (CEC) प्रमुख एला पाम्फिलोवा यांच्या म्हणण्यानुसार, देशात 77.44% ची विक्रमी मतदान झाले.