Russian Prime Minister Mikhail Mishustin (PC-IANS)

रशियाचे पंतप्रधान (Russian Prime Minister) मिखाईल मिशस्टीन (Mikhail Mishustin) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मिशस्टीन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. या बातमीमुळे संपूर्ण रशियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिखाईल मिशस्टीन यांनी सध्या संपूर्ण कामकाजाची धुरा उपपंतप्रधानांकडे सोपवली आहे.

रशियालादेखील कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. रशियामध्ये आतापर्यंत तब्बल 10,0000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 1 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. (हेही वाचा - COVID-19: अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरुच! गेल्या 24 तासांत 2000 हून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू)

दरम्यान, पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांनी गुरूवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. यावेळी मिखाइल यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तसेच उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव यांच्याकडे पंतप्रधान पदाची सुत्रं सोपवली. त्यामुळे व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशस्टीन यांच्या प्रस्तावाचं संमती दिली.