‘Harry Potter’s Castle’ Destroyed PC TWITTER

‘Harry Potter’s Castle’ Destroyed:  रशिया आणि युक्रेनच्या या पूर्वीच्या हल्ल्यात दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाने पुन्हा एकदा हल्ला केला. यात युक्रेयन येथील नयनरम्य असलेल्या आणि जग प्रसिध्द असलेला 'हॅरी पॉटर कॅस्टल'ची इमारत उद्ध्वस्त झाली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हॅरी पॉटरचा कॅस्टल आगीने जळत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. (हेही वाचा- किर्गिस्तानमध्ये मोठी दुर्घटना, अनियंत्रित ट्रकची 29 विद्यार्थ्यांना धडक, घटनेचा Video व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी एक राजकारणी, गरोदर महिला तसेच दोन लहान मुले आहे असं म्हटलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेत नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. एकाने लिहले आहे की, हे युध्द का थांबू शकत नाही?  तर दुसऱ्याने लिहले आहे की, कृपया युध्द संपवावे.

हॅरी पॉटर कॅस्टलची आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. आगीचे धुर परिसरात पसरले आहे. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात हॅरी पॉटरच्या कॅस्टलचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे आणि जवळपासच्या अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. [Poll ID="null" title="undefined"]त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.