Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमी देशांनी रशिवार कठोर आर्थिक बंदी घालण्यासाठी वेग वाढवला आहे. शनिवारी Visa आणि Master Card ने रशियातील आपल्या सेवा बंद केल्याची घोषणा केली आहे. क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंट मधील बड्या कंपन्यांनी असे पाऊल उचलल्यामुळे रशियाच्या बाहेर त्यांच्या कंपनीची कार्ड काम करणार नाहीत.(Russia-Ukraine War: युक्रेनमधील परिस्थितीसाठी Volodymyr Zelenskyy यांनी NATO ला ठरवले जबाबदार; म्हणाले, त्यांनीचं हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला)
Visa ने आपल्या एका विधानात असे म्हटले की, कंपनी सर्व भागीदार आणि ग्राहकांसह रशियात व्हिसा कार्डच्या माध्यमातून होणारी देवाणघेवाण थांबवण्याचे काम करत आहे. त्यानंतर रशियात व्हिसा कार्डच्या माध्यमातून कोणतेही ट्रांजेक्शन करता येणार नाही. रशियाच्या बाहेर देण्यात आलेल्या व्हिसा कार्ड सुद्धा रशियात काम करु शकणार नाहीत. अशा प्रकारे रशियाच्या बँकांकडून देण्यात आलेले कार्ड हे तेथे किंवा त्याच्या बाहेर ट्रांजेक्शनसाठी वापरता येणार नाहीत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, या मागील मुख्य कारण म्हणजे युक्रेनमध्ये निर्माण झालेले संकट आहे. Visa चे चेअरमॅन आणि सीईओ अल केली (Al Kelly) यांनी असे म्हटले की, या युद्धामुळे शांतता आणि स्थिरतेला वाढणारा धोका लक्षात घेता, आपण आपल्या मूल्यांनुसार प्रतिसाद देणे अत्यावश्यक आहे.
Tweet:
Mastercard, Visa suspend operations in Russia after invasion. AP
— Press Trust of India (@PTI_News) March 5, 2022
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे मास्टरकार्डने सुद्धा आपली नेटवर्क सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी असे म्हटले की, काही आर्थिक संस्थांचे ट्रांजेक्शन ब्लॉत करण्याचा कंपनीचा निर्णय काही जागतिक नियामक संस्थांच्या गरजेनुसार घेतला गेला. मास्टरकार्डने असे ही स्पष्ट केले की, रशियाच्या बाहेर जारी केलेले मास्टरकार्ड रशियातील बँक किंवा एटीएममध्ये काम करणार नाहीत.
दरम्यान, व्हिसा आणि मास्टरकार्ड यांनी आपल्या सेवा रशियात बंद केल्यानंतर येथील शासकीय बँकांनी असे म्हटले की, यामुळे रशियाच्या Sberbank च्या माध्यमतून दिलेली कार्ड हे देशात वापरता येणार आहेत. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही आहे. तसेच त्यांनी असे म्हटले की, इंटरनॅशलन पेमेंट सिस्टिम व्हिसा आणि मास्टरकार्डने रशियात आपल्या चलनाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरीही Sberbank यांनी दिलेली व्हिसा आणि मास्टरकार्ड रशियात काम करणार आहेत.