Sputnik V vaccine | (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

रशियाकडून मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेली Sputnik V ही कोविड 19 विरूद्धची लस आता भारतामध्ये येण्यास सज्ज आहे. रशियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या लसीचे सुमारे 100 दशलक्ष डोस हे भारताच्या Dr Reddy Laboratories ला दिले जाणार आहे. दरम्यान यासाठी  रेग्युलेटरी परवानगी अद्याप प्रतिक्षा आहे. ही लस कोविड 19 विरूद्ध बनवण्यात आली असली तरीही त्याची क्लिनिकल ट्रायल अजूनही सुरू आहे. COVID-19 Vaccine Update: रशिया मध्ये कोरोना व्हायरस वरील 'Sputnik V' लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन

Russian Direct Investment Fund कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतातील रेड्डी लॅबोरेटरी ही खाजगी लॅब मॉस्कोसोबत पार्टनरशिप करून त्याचे क्लिनिकल ट्रायल्स करणार आहे. कालच रशियाच्या या कोविड 19 लसीमध्ये उत्पादनात भारत मदत करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. (रशियाच्या कोविड 19 लसीच्या मानवी चाचणीत सहभागी स्वयंसेवकाचा फोटो राष्ट्रपती पुतिनच्या लेकीचा? जाणून घ्या सत्य)

भारतातील सीरम इन्स्टिट्युट ही जगात सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सुरूवातील अदार पुनावाला यांच्या कंपनीला या रशियाच्या लसीवर काम करण्याची संधी मिळू शकते असं वाटलं होतं, मात्र सध्या सीरम इंस्टिट्युट युके मधील ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या उत्पादनाचं काम करत आहे. COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Serum Institute ला Oxford-AstraZeneca च्या लसीच्या पुन्हा मानवी चाचणी सुरू करायला DCGI कडून परवानगी.

जगभरात कोविड 19 वरील लसीच्या संशोधनासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी अमेरिका, युके सारखे पाश्चात्य देश यांना मागे टाकून रशियाने कोविड 19 वर पहिली लस आणल्यानंतर अनेकांनी त्याकडे संशयाने पाहिले आहे. दरम्यान या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली नसल्याने अमेरिका आणि युके ने त्याच्या वापराला नापसंती दर्शवली आहे.

आज चीनमध्येही एका लसीने क्लिनिकल ट्रायलच्या 3 र्‍या टप्प्यामध्ये सकारात्मक परिणाम दाखवल्याचे सांगण्यात आले आहे.