Fact Check (Photo Credits-Twitter)

रशियाचे (Russia)  राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी कोरोनावरील पहिली लस (Coronavirus Vaccine) आम्हाला मिळाल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. रशियाने या लसीचे रजिस्ट्रेशन सुद्धा केले आहे. त्याचसोबत येत्या 2021 या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण जगभरात कोरोनावरील ही लस उपलब्ध केली जाईल अशी आशा सुद्धा केली जात आहे. रशियातून आलेली ही बातमी सकारात्मक मानली जात आहे. खरंतर रशियाचे राष्ट्रपती यांनी जगातील पहिली कोविड19 लस विकसित करण्यासह त्यांच्या मुलीला याचा डोस देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सोशल मीडियात एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यातील मुलगी ही पुतिन यांची असल्याचा दावा केला जात आहे. परंतु व्हिडिओ बद्दल अधिक सांगायचे झाल्यास तर तो चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आल्याचे कळून येते.

राष्ट्रपती पुतिन यांनी त्यांच्या मुलीला कोविड19 च्या विरोधातील लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. परंतु पुतिन यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियात एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून त्याला पुतिन यांच्या मुलीला कोविड19 च्या लसीचा डोस दिल्याचे शीर्षकात म्हटले आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की हजारो लोकांनी तो एकमेकांना पाठवला आहे.(Coronavirus Vaccine बनवल्याचा रशियाचा दावा, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीसाठी झाला पहिल्यांदा वापर)

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ बद्दल InVID यांनी अधिक खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पुतिन यांची व्हिडिओतील मुलगी नाही आहे. हा व्हिडिओ 26 जून 2020 रोजीचा आहे. खरंतर कोरोनाचा सारख्या महासंकट काळात सोशल मीडियात खोटी माहिती किंवा बातम्या दिली जात आहेत. परंतु त्यांची सत्यता न जाणता त्या कोणालाही पाठवू नयेत असे आवाहन वारंवार नागरिकांना करण्यात येत आहे.