रशिया पुन्हा एकदा बंडाच्या उंबरठ्यावर आहे. रशियामध्ये राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना थेट आव्हान मिळाले आहे. हे आव्हान रशिया आणि पर्यायाने व्लादिमीर पुतिन यांनीच पाळलेल्या भाडोत्री सैनिकांच्या एका मोठ्या गटाकडून मिळाले आहे. वॅग्नर ग्रुप (Wagner Mercenary Group) असे या गटाचे नाव असून, येवगेनी प्रीगोझिन (Yevgeny Prigozhin) त्याचे प्रमुख आहेत . येवगेनी यांनी दावा केला आहे की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरुन पुतिन यांना हटवले आहे आणि रशियाची राजधानी मॉस्कोवर ताबा मिळवला आहे. लवकरच देशाला नवा नेता मिळेल, असाही त्यांनी दावा केला आहे.
वॅग्नर ग्रुपने बंड केल्यापासून रशियाचे लष्कर आणि बंडखोर ग्रुप यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो आहे. दरम्यान, वॅग्नर ग्रुपने दावा केला आहे की, त्यांनी रशियन लष्कराची तीन हेलीकॉप्टर पाडली आहेत. आमच्या मार्गात जे काही, कोणी येईल त्यांना आपण बाजूला करु आणि पुढे जाऊ, असेही या गटाने म्हटले आहे.
ट्विट
Wagner Group personnel
2017: 6,000 (estimate)
2023: Over 50,000 pic.twitter.com/osWfihT6fp
— The Spectator Index (@spectatorindex) June 25, 2023
सीएनएन मॉस्कोने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, काही लोक देशाशी विश्वासघात करत आहेत. ते गृहयुद्धाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे रशिया त्यांना कधीही माफ करणार नाही. ते देशद्रोही आहेत.
ट्विट
We all remember how the head of Russia threatened the world in 2021. He had some ultimatums, he was trying to show a kind of strength...
The year 2022 showed that he confused – confused his illusions and the lies he was fed with strength. They in the Kremlin are capable of… pic.twitter.com/rwOhLvQJAF
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 24, 2023
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की रशियाचे व्लादिमीर पुतिन बहुधा "खूप घाबरलेले" आहेत आणि मॉस्कोवर बंडखोर भाडोत्री सरसावल्याने ते कुठेतरी लपले आहेत. झेलेन्स्की यांनी राष्ट्राला दिलेल्या आपल्या दैनंदिन भाषणात सांगितले की पुतिन यांनी "हा धोका स्वतःच निर्माण केला आहे."