Rida Isfahani (संग्रहित संपादित प्रतिमा)

पाकिस्तानी अभिनेत्री रिदा असफहानी (Rida Isfahani) नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याने खूप चर्चेत आली होती. एमएमएस लीक झाल्यानंतर रिदाबद्दल माध्यमांमध्ये खूप काही बोलले गेले होते. त्या दिवसांत तिने घडल्या प्रकाराबद्दल काही भाष्य केले नसले तरी, आता तब्बल 6 वर्षांनतर तिने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री रिदा इस्फहानीने अलीकडेच पाकिस्तानी कॉमेडियन नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल आपले मन मोकळे केले.

एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याबद्दल तिने तिचा फोटोग्राफी डायरेक्टर (DOP) असलेल्या मंगेतराला जबाबदार धरले आहे. त्याने आपला विश्वास तोडल्याचे तिने सांगितले. यावेळी रिदा म्हणाली, ‘माझ्या मंगेतराने माझा विश्वास तोडला होता. मला माझे आयुष्य एका चांगल्या व्यक्तीसोबत व्यतीत करायचे होते. त्याने मला प्रपोज केले आणि मी त्याचा प्रस्ताव स्वीकारला. माझे आई-वडील या नात्यासाठी तयार नव्हते, पण मी त्यांना तयार केले. आमचा साखरपुडा झाल्यानंतर तीन वर्षांनी, त्याने माझे खाजगी फोटो लीक केले. मी अमेरिकेत असताना ही गोष्ट घडली.’

त्या वेदनादायक काळाबद्दल बोलताना रिदा म्हणाली, ‘त्यावेळी जे काही घडले त्यानंतर काही लोकांनी मला पत्रकार परिषदेत याबद्दल बोलण्यास सांगितले, परंतु मी त्याबद्दल कधीही बोलले नाही. कारण माझ्यासोबत जे काही घडले ती माझी शोकांतिका होती, जी माझ्या कबरीपर्यंत माझ्यासोबत जाईल, असे मला वाटत होते. अशा काही गोष्टी घडल्यानंतर लोक तुम्हाला कधीच माफ करत नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भूतकाळासाठी तुम्हाला दोष देत राहतात. आता मी त्याचा सामना करत आहे.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'वादानंतर मी एजन्सीद्वारे त्याच्याशी (मंगेतर) संपर्क साधला कारण त्यावेळी मला त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्याने जे केले त्यामुळे मी खूप दुखावले आणि माझ्या लोकांसमोर मला (अजूनही) लाज वाटते.’ तिच्या कुटुंबियांवर केलेल्या काळ्या जादूबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'माझ्यावर अन्याय केल्याबद्दल त्या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना मी माफ केले आहे, पण माझ्या आईवर गेल्या 10 वर्षांपासून ज्याने काळी जादू केली आहे त्याला मी त्याला माफ करणार नाही.' (हेही वाचा: माकडाचा माजी मिस पेरू Paula Manzanal चे स्तन उघड करण्याचा प्रयत्न; मारली थप्पडही (Watch Video)

दरम्यान, रिदा इस्फहानीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिच्या करिअरची सुरुवात 'रोग' नावाच्या ड्रामामधून केली. त्यानंतर 'मेरी सहेली मेरी भाभी', 'मोहे पिया रंग लगा', 'मुरादा माई', 'जॅक्सन हाइट्स', 'चोर दरवाजे', 'मोहब्बत हमसफर मेरी' आणि 'दहलीज' मधील तिच्या कामासाठी ओळखले गेले.