Richest Man In The World: जेफ बेझोसना मागे टाकून फॅशन इंडस्ट्रीमधील Bernard Arnault बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या नक्की काय आहे त्यांचा व्यवसाय
Bernard Arnault (Photo Credits: Wiki Commons)

गेल्या अनेक आठवड्यांपासून अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि एलोन मस्क हे आलटून पालटून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिल्या आहेत. मात्र आता या दोघांनाही मात मिळाली आहे. जेफ बेझोस यांच्याकडून जगातील पहिल्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्तीची खुर्ची काढून घेण्यात आली आहे. आता जगातील सर्वात मोठी फॅशन लक्झरी वस्तू कंपनी लुई विटॉन मोट हेनेसी (LVMH) चे 72 वर्षीय मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Man In The World) बनले आहेत. फोर्ब्सनुसार, बर्नार्ड अर्नाल्टची एकूण मालमत्ता 186.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 13.28 लाख कोटी इतकी आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, बर्नार्ड अर्नाल्टने गेल्या महिन्यात त्यांच्या कुटुंबाद्वारे नियंत्रित फ्रेंच लेव्हल ब्रँड कंपनीचे शेअर्स 538 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले. यावर्षी आतापर्यंत बर्नार्ड अर्नाल्टची संपत्ती 72 अब्ज डॉलर्सने वाढली आहे, यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ते बनले आहेत.

आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसची संपत्ती यावर्षी 2 टक्क्यांने कमी झाली आहे. त्याचबरोबर जगातील तिसरे श्रीमंत उद्योगपती आणि ई-वाहन उत्पादक टेस्लाचे सह-संस्थापक एलोन मस्क यांची मालमत्ता यावर्षी 8.09 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 60,000 कोटी रुपयांनी घटली आहे.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी यावर्षी मालमत्तेत 7.50 टक्के वाढ नोंदविली आहे. त्याच वेळी फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती जवळपास 14 टक्क्यांनी वाढली आहे. जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफेच्या मालमत्तेत जवळपास 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या व्यतिरिक्त गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेजची संपत्ती यावर्षी 22.80 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. (हेही वाचा: Brazil: राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांना सुनावण्यात आली शिक्षा; कोरोना सुरक्षा नियमांचे पालन न करणे पडले महागात)

कोण आहेत बर्नार्ड अर्नाल्ट?

अर्नाल्ट जगभरातील 70 ब्रँडचे मालक आहेत ज्यात लुई व्हूटन आणि सेफोरा सारख्या जगातील नामांकित ब्रँडचा समावेश आहे. Christian Dior मध्ये त्यांचा 96.5% हिस्सा आहे, ज्याचा एलव्हीएमएचमध्ये 41 टक्के हिस्सा आहे. फ्रान्समधील तिसरे सर्वात मोठे शहर Roubaix येथे 5 मार्च 1949 रोजी अर्नाल्टचा जन्म झाला. त्यांनी नामांकित कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अर्नाल्टच्या वडिलांचा कंस्ट्रक्शन बिजनेस होता. 1985 मध्ये, अर्नाल्ट यांनी 15 दशलक्ष डॉलर्समध्ये Christian Dior खरेदी करून नवीन व्यवसायात पाउल ठेवले. 1989 मध्ये, ते एलव्हीएमएच येथे मेजॉरिटी स्टॅक होल्डर झाले आणि जगातील सर्वात मोठा लक्झरी प्रॉडक्ट ग्रुप उभा केला.