Reliance Industries Limited MD and Chairman Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Reliance Industries chairman Mukesh Ambani) जगातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. अंबानींनी गुगलचे संस्थापक लॅरी पेज  आणि सर्गे ब्रिन यांना मागे टाकले आहे. फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या रिअल टाइम यादीनुसार, अंबानींची संपत्ती 6070 कोटी डॉलर (4.33 लाख कोटी रु) आहे. तर लॅरी पेज यांची संपत्ती 4.25 लाख कोटी रुपये असून ते यादीच 10 व्या स्थानावर आहेत. तसेच सर्गे ब्रिन यांची संपत्ती 4.10 लाख कोटी असून ते 11 व्या क्रमांकावर आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी अलिबाबा या कंपनीचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले होते. अंबानी यांची 'रिलायन्स' ही कंपनी 10 लाख कोटी रुपयांचे भांडवल असणारी देशातील पहिली कंपनी आहे. (हेही वाचा - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला बनले यंदाचे फॉर्च्यून 'बिझनेस पर्सन ऑफ द इयर')

फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे पहिल्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती 8 लाख कोटी येवढी आहे. बजोस हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. तर एलव्हीएमएच कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट फॅमिली हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 7.67 लाख कोटी एवढी आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 7.66 लाख कोटी ऐवढी आहे. तर जागतिक श्रीमंताच्या यादीत वॉरेन बफे बर्कशायर हे चौथ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा - अनिता इंदिरा आनंद ठरल्या कॅनडाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील पहिल्या हिंदू धर्मिय महिला मंत्री; जाणून घ्या त्यांचा प्रवास

यात मार्क झुकेरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्ज प्रत्येकवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करत असते. यंदा या यादीत मुकेश अंबानी यांनी नववे स्थान पटकावले आहे. यंदा अंबानींनी गुगलच्या संस्थापकांनाही मागे टाकले आहे.