स्टंटबाजी पडली महागात, गमावला कॅनेडियन गायकाने जीव
jonjames फोटो सौजन्य- इंस्टाग्राम

कॅनडाचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर जॉन जेम्स मॅकमुरेय हा नेहमीच त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना खुष करत असतो. तसेच जॉनची स्टंटबाजीमध्ये ही ओखळ होती. मात्र यावेळी विमानाच्या पंख्यासोबत स्टंट करताना त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

जॉन जेम्स मॅकमुरेय त्याच्या चाहत्यांसाठी एक नवीन गाण घेऊन येणार होता. त्यासाठी जॉन त्या गाण्याच्या व्हिडिओद्वारे त्याचे चित्तथरारक स्टंट  प्रेक्षकांना दाखविणार होता. यासाठी त्याने विमानाच्या पंखावर जाऊन गाणे गायला सुरुवात केली. मात्र अचानक विमानाचे संतुलन बिघडल्याने जॉन त्या पंखावरुन हजारो फुटांवरुन खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.

परंतु जॉनच्या मॅनेजरने विमान पायलटला या घटनेबद्दल दोष दिला आहे. तसेच पायलट याने जॉनच्या स्टंटवेळी विमानाचे संतुलन राखण्याचे प्रयत्न केले. तर जॉनकडे असलेले पॅरेशूट  योग्य वेळी न उघडल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.