Ramadan 2022: अमेरिकेत न्यूयॉर्कच्या Times Square परिसरात पहिल्यांदा मुस्लिमांची 'Taraweeh' पडली पार
Taraweeh in US | PC: Twitter/ANI

मुस्लिमधर्मियांचा पवित्र महिना रमजान (Ramadan) सुरू झाला आहे. या काळात दिवसभराचा उपवास आणि प्रार्थना करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोना संकट शमल्याने आता पुन्हा सामुहिकरित्या सण-समारंभ साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये टाईम्स स्क्वेअर परिसरात इतिहासात पहिल्यांदाच Taraweeh पार पडली. Taraweeh म्हणजे रमजान महिन्यात रात्रीच्या वेळेस केली जाणारी प्रार्थना आहे.

Taraweeh ही पवित्र कुराणचा एक भाग आहे जो रमझानमध्ये दररोज महिना पूर्ण होईपर्यंत पठण केला जातो. शनिवारी (2 एप्रिल) रात्री, शहरातील सर्वात व्यस्त टाइम्स स्क्वेअरच्या फुटपाथवर 1500 मुस्लिमांना जेवण देण्यात आले, त्यानंतर शेकडो मुस्लिमांनी तरावीहच्या प्रार्थनेत भाग घेतला. Ramadan 2022 Tradition: रमजानचा उपवास सोडताना खजूरचे सेवन का करतात? घ्या जाणून .

 

View this post on Instagram

 

A post shared by SQ✨ (@wayoflifesq)

टाइम्स स्क्वेअर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटनमधील एक प्रमुख व्यावसायिक क्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. हे सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार इथे प्रतिवर्षी 50 मिलियन पर्यटक भेट देतात.

"इस्लाम म्हणजे काय हे माहित नसलेल्या सर्वांना आमचा धर्म समजावून सांगण्यासाठी आम्ही येथे आहोत. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे." असे आयोजकांपैकी एकाने मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे.

रमझान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे, ज्या दरम्यान इस्लामधर्मीय पहाटे आणि सूर्यास्ताच्या दरम्यान उपवास करतात, शांतता आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात, दान करणं, वंचिताना आधार देणं, अन्नदान करणं अशा मानवतावादी कार्याला या महिन्यात चालना दिली जाते.

रमजान हा एक वार्षिक नियम आहे जो इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानला जातो. चंद्रकोरीच्या महिन्याभराच्या प्रवासामध्ये हा उपवास पाळला जातो.